@maharashtracity

मुंबई: बेस्ट उपक्रमाच्या डिजीटायझेशन (Digitisation of BEST) प्रकल्पाचा एक भाग म्हणून बसगाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा देण्याच्या दृष्टीने ‘ चलो मोबाईल अँप’ (Chalo Mumbai App) आणि ‘ ‘बेस्ट स्मार्ट कार्ड’ (BEST Smart Card) यांचा लोकार्पण सोहळा मंगळवार २१ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता सह्याद्री अतिथी गृह येथे राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

बेस्ट उपक्रमाच्या विद्यमान तिकीट वितरण पध्दतीचे आणि बसपासचे देखील आधुनिकीकरण करण्यात येत आहे. स्मार्ट कार्डच्या सहाय्याने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डशी (National Common Mobility Card – NCMC) अनुरुप स्वयंचलित बसभाडे जमा यंत्रणेच्या माध्यमातून विद्यमान तिकीट वितरण प्रणालीचे अद्ययावतीकरण आणि नवीन बसपास पध्दती सुरु करण्यात येत आहे.

या प्रणाली अंतर्गत इलेक्ट्रॉनिक तिकीटिंग इश्युइंग मशीनमध्ये (Automatic Electronic Ticketing Issuing Machine) रोख रकमेच्या सहाय्याने नियमित तिकीट / बसपास वितरणाबरोबरच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड, स्मार्टकार्ड आणि भ्रमणध्वनीच्या सहाय्याने ई – पर्स च्या माध्यमातून तिकीट / बसपास वितरणाची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे.

मोबाईलच्या सहाय्याने ई – पर्स च्या माध्यमातून तिकीट / बसपासची सुविधा प्राप्त करण्याकरीता विकसित केलेले ” चलो ” हे मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर अथवा https://play.google.com/store/apps/details?id=app.zophop या लिंकवरुन भ्रमणध्वनीमध्ये डाऊनलोड करणे आवश्यक आहे, असे बेस्टने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here