@maharashtracity

मुंबई: बेस्ट उपक्रमाने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा असलेले ‘चलो मोबाइल ॲप’ आणि ‘स्मार्ट कार्ड’ सेवा उपलब्ध केली आहे.

बेस्ट उपक्रम जरी कोट्यवधी रुपयांनी तोट्यात असले तरी बेस्ट प्रवाशांना काहीतरी नवीन देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून, ‘चलो मोबाइल ॲप’ (Chalo Mobile App) आणि ‘स्मार्ट कार्ड’ (Smart Card) ही सुविधा उपलब्ध करून सार्वजनिक सेवेत आपले लडखडणारे पाय भक्कम करण्याचा ‘बेस्ट’चा (BEST) प्रयत्न आहे.

बेस्टच्या ‘चलो मोबाइल ॲप’मुळे प्रवाशांना बस स्टॉपवर बस नेमकी किती वाजता येणार आहे, हे समजणार असून त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.

तसेच, ‘स्मार्ट कार्ड’ मुळे सुट्ट्या पैशांची समस्या सुटणार आहे. बेस्टने प्रवाशांना सुखकर प्रवास देण्यासाठी ७२ प्लॅन उपलब्ध केले आहेत.

बेस्टच्या या ‘चलो मोबाइल ॲप’ आणि ‘स्मार्ट कार्ड’ या सुविधेमुळे बेस्ट प्रवाशांचा प्रवास अधिक चांगला होण्यास मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here