@maharashtracity

१२ नाव्हेंबर जागतिक मधुमेह दिनानिमित्त पालिकेकडून विशेष जागरुकता मोहिम

मुंबई: ३० वर्षावरील सर्वांनी वर्षातून किमान एकदा मधुमेह चाचणी ( Diabetes test ) करवून घ्यावी असा आरोग्य सल्ला मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी ( Mumbai Municipal Corporation Additional Commissioner Suresh Kakani) आणि कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे ( Health Officer Dr. Mangala Gomare) यांनी एकाच वेळी दिला.

कोविड दरम्यान रुग्णांना मधुमेहाचा झालेला त्रास पाहता पालिकेच्या अधिकाऱ्यांनी एकच सल्ला देणे गंभीर बाब असून मधुमेह टाळण्यासाठी आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा अंगिकार करावे असेही सांगण्यात आले.

नियमित व वेळेवर सुयोग्य आहार घेणे, दररोज व्यायाम करणे, पायी चालणे, सायकल चालविणे यासह पुरेशी झोप घेणे, यासारख्या बाबींचा समावेश प्रत्येकाने करावा असे ही यावेळी सुचविण्यात आले.

१४ नोव्हेंबर रोजी येणाऱ्या जागतिक मधुमेह दिनानिमित्त आयोजित पालिकेच्या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

या कार्यक्रमात मधुमेह विषयक जनजागृतीपर ( Diabetes Awareness) एका विशेष भित्तीपत्रकाचे प्रकाशन सुरेश काकाणी यांच्या हस्ते करण्यात आले.

अतिरिक्त आयुक्त काकाणी पुढे म्हणाले कि, असंसर्गजन्य आजार नियंत्रणावर विशेष भर देऊन प्राथमिक आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.

कोविड-१९ ( covid 19) या संसर्गजन्य आजारामुळे होणाऱ्या मृत्युंकरिता मधुमेह हा एक महत्त्वाचा जोखमीचा घटक असून नागरिकांनी वेळेत मधुमेहाचे निदान, रक्तातील साखरेचे नियंत्रित प्रमाण व जीवनशैलीतील बदल या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असल्याचे काकाणी यांनी सांगितले.

त्याचवेळी मधुमेही रुग्णांचे कोविड लसीकरण झाल्याची खात्री करण्यावर त्यांनी भर दिला. तर पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, ३० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांनी वर्षातून किमान एकदा मधुमेह व उच्च रक्तदाबाकरिता तपासणी करून घ्यावी. असेही डॉ. गोमारे यांनी आवर्जून नमूद केले.

तर उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह ( Executive Health Officer Dr. Daksha Shah) यांनी मधुमेह आणि उच्च रक्तदाबच्या रुग्णांकरिता भारतीय आहारतज्ञ संघटनेच्या मदतीने आहारतज्ञांमार्फत समुपदेशन सेवा १ नोव्हेंबर पासून सुरु करण्यात आली असल्याचे डॉ. शाह म्हणाल्या.

तसेच नायर रुग्णालयातील ( nair hospital) आहार तज्ज्ञ जयश्री परांजपे आणि के. ई. एम. रुग्णालयातील आहार तज्ज्ञ सफला महाडिक ( Dietitians Jayashree Paranjape ) ( Safala Mahadik) यांनी संगणकीय सादरीकरणासह दैनंदिन जीवनातील आरोग्यपूर्ण आहाराबाबत मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here