Twitter :@maharashtracity

मुंबई :

मुंबईत १ ते ८ ऑक्टोबर या कालावधीत हिवताप (malaria) २११, लेप्टो ११, डेंग्यू २५०, गॅस्ट्रो ९२, हेपेटायटिस १३, चिकनगुनिया ७ तर एच१एन१ १०असे रुग्ण आढळले. मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आरोग्य विभागाकडून प्रसारित करण्यात येणाऱ्या साप्ताहिक आरोग्य अहवालात आरोग्य विभागाने अशा रुग्णांची नोंद केली आहे.

डेंग्यू पाठोपाठ हिवताप आणि गॅस्ट्रो रुग्ण देखील आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत मलेरिया व डेंग्युसहित (Dengue) सर्व आजारांच्या रुग्ण संख्येत घट असल्याचे आरोग्य विभागाकडून (health department) सांगण्यात येत आहे. यंदाच्या जुलै, ऑगस्ट सप्टेंबर या पावसाळी महिन्यात डेंग्यू रुग्णांची वाढती संख्या असल्याचे रुग्ण नोंदच सांगते. जसे जुलै महिन्यात ६८५, ऑगस्ट महिन्यात ९९९ तर सप्टेंबर महिन्यात १३६० रुग्ण आढळले. हा वाढता आलेख मुंबईकरांच्या आरोग्यासाठी इशाराच देत होता.

आजही नव्या सुरु झालेल्या ऑक्टोबर महिन्यात पहिल्याच आठवड्यात २५० डेंग्यू रुग्णांची नोंद असून इतर आजारांच्या तुलनेत ही सर्वाधिक आहे. यावर पालिका प्रशासनाने सांगितले की, पावसाळी आजार रुग्णांचे ट्रॅकिंग केले जात असून ज्या ठिकाणी रुग्ण आढळतात, त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जाते. सर्वत्रच प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात असून यात सर्वेक्षण, तापग्रस्त रुग्णांचे तपासणी आणि उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले. रुग्ण नोंदीच्या कालावधीतच साडे तीन लाख घरांचे सर्वेक्षण करण्यात आले असून या घरातून साडे सतरा लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केले. तर २९ हजार २८३ जणांचे रक्तनमुने संकलित करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here