@maharashtracity

वरळीतील गॅस सिलेंडर स्फोट दुर्घटना

मुंबई: वरळीत मंगळवारी सकाळी गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन त्यात एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले. त्यापैकी एक चार महिन्याचे बाळ होते. या बाळाचा रात्री मृत्यू झाल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

वरळी येथील गणपतराव जाधव मार्ग बीडीडी चाळ क्रमांक 3 मधील एका घरात मंगळवारी सकाळी 7.11 वाजता गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोट झाल्याने घरात आग लागली.

यातील चार जखमींपैकी गंभीर भाजलेल्या 4 महिन्याचा मंगेश पुरी या बाळाचा काल रात्री मृत्यू झाला. रुग्णालयात दाखल असलेल्या आनंद पुरी (27) गंभीर असून उपचार सुरु आहेत. विद्या पुरी (25) 50 ते 60 टक्के भाजल्या आहेत. विष्णू पुरी (5) हा मुलगा 15 ते 20 टक्के भाजला आहे.

विद्या आणि विष्णू यां दोघांवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप झाल्याने नायर रुग्णालयाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणाची चौकशी उप अधिष्ठाता करणार असून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here