@maharashtracity

शिवसेनेच्या प्रशांत जाधव यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्याला दिला इशारा

नवी मुंबई: राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृवाखाली शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेसचे (Congress) महाविकास आघाडी (MVA) सत्तेवर आहे. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री सेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबद्दल अधून मधून वादग्रस्त विधाने करून शिवसेनेला डीवचण्याचे उद्योग करत असते. यावेळी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भारणे (Minister Dattatray Bharne) यांनी वादग्रस्त विधान केले आहे आणि त्यांना नवीन पनवेलचे शिवसेना उपविभाग प्रमुख प्रशांत जाधव (Prashant Jadhav of Shiv Sena) यांनी कठोर शब्दात इशारा दिला आहे.

सोलापुरात एका कार्यक्रमात बोलतांना मंत्री दत्तात्रय भारणे उर्फ दत्ता मामा यांची जीभ घसरली. बोलण्याच्या ओघात दत्ता मामा
‘मुख्यमंत्र्यांचं जाऊ दा, मरु द्या’ असं वक्तव्य केलं.

या वक्तव्यामुळे शिवसैनिक (Shiv Sainik) चांगलेच आक्रमक झाले आहेत. नवीन पनवेल (New Panvel) शिवसेना उपविभाग प्रमुख प्रशांत जाधव यांनी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा खरपूस समाचार घेतला आहे.

कोण हे दत्तात्रय भारणे? तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? नसेल तर शिवसैनिक ते ठिकाणावर आणतील, असा इशारा प्रशांत जाधव यांनी दिला.

यापुढे अशी बेताल वक्तव्य खपून घेतली जाणार नाही. स्वतःच्या तोंडाला आवर घाला, अन्यथा शिवसेना स्टाईलने आम्ही उत्तर देऊ, असा सज्जड इशारा प्रशांत जाधव यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here