@maharashtracity

मुंबई: मुंबई महापालिकेच्या (BMC) मैदानांवर दिव्यांग व्यक्तींनाही इतरांप्रमाणे खेळाचा आनंद लुटता यावा, यासाठी मैदान ठराविक वेळ राखून ठेवण्यात यावा आणि त्यांच्यासाठी काही प्रमाणात खेळणीही उपलब्ध करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक हरीश छेडा (BJP Corporator Harish Chheda) यांनी पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भातील एक ठराव त्यांनी मांडला असून या ठरावाला पालिका सभागृहात बहुमताने अथवा एकमताने मंजुरी मिळून त्यावर आयुक्त यांनी सकारत्मक अभिप्राय दिल्यास दिव्यांग (Divyang) लोकांसाठी एक चांगली बाब ठरणार आहे.

मुंबईत पालिकेची लहान व मोठी अशी अनेक मैदाने आहेत. या मैदानावर लहान व तरुण मुले दररोज खेळत असल्याने दिव्यांग व्यक्तींना अशा मैदानांवर जाऊन खेळाचा आनंद लुटता येत नाही, ही गंभीर बाब लक्षात घेता नगरसेवक हरिश छेडा यांनी, ठरावाची सूचना मांडली आहे.

Also Read: रविकांत तुपकर करणार बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह

भारतीय राज्य घटनेतील (Indian Constitution) तरतुदीप्रमाणे देशातील सर्वप्रकारच्या नागरिकांना जीवन जगण्याचा समान अधिकार आहे. मात्र, पालिका मैदानांवर दिव्यांग व्यक्तींना खेळण्यासाठी अडचणी येतात. तर धडधाकट व्यक्तींना, मुलांना, तरुणांना पालिका मैदानांवर खेळाचा मनमुराद आनंद लुटता येतो.

या दिव्यांग व्यक्तिंसाठी केंद्र व राज्य सरकारच्या काही चांगल्या योजना आहेत. मात्र दिव्यांग व्यक्तींच्या शारीरिक विकासाबाबत काहीसे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे, असे भाजप नगरसेवक हरिश छेडा यांनी म्हटले आहे.

मुंबईत दिव्यांग व्यक्तींची संख्या बऱ्यापैकी आहे. मात्र या दिव्यांग व्यक्तींसाठी पालिकेची मैदाने उपलब्ध होत नाहीत. मैदाने कधी उपलब्ध झाली तरी त्यांच्यासाठी खेळाची साधने उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे त्यांना इतर धडधाकट व्यक्तींप्रमाणे पालिका मैदानांवर खेळण्यात काही अडथळे व अडचणी येतात.

मुंबई महापालिकेच्या मैदानांवर दिव्यांग व्यक्तींनाही इतरांप्रमाणे खेळाचा आनंद लुटता यावा, यासाठी मैदान ठराविक वेळ राखून ठेवण्यात यावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक हरीश छेडा यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here