@maharashtracity

राज्यात ४३,२११ तर मुंबईत ११,३१७ नव्या रुग्णांची नोंद

मुंबई: राज्यात शुक्रवारी ४३,२११ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर मुंबईत दिवसभरात ११,३१७ रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे राज्यात दिवसभरात ३ हजार १९५ एवढी घट तर मुंबईत २ हजार ३८५ एवढी घट दिसून आली.

आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७१,२४,२७८ झाली आहे. तसेच ३३,३५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६७,१७,१२५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.२८ टक्क्यांवर आले आहे.

तसेच राज्यात आज रोजी एकूण २,६१,६५८ सक्रिय रुग्ण असल्याचे सांगण्यात आले. तर राज्यात शुक्रवारी १९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आले. तर सध्या राज्यातील मृत्यूदर १.९८ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,१५,६४,०७० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७१,२४,२७८ (९.९६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर सध्या राज्यात १९,१०,३६१ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) असून ९२८६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे सांगण्यात आले.

मुंबईत दिवसभरात ११, ३१७ नवे रुग्ण

मुंबईत (Mumbai) शुक्रवारी ११,३१७ कोरोना रुग्ण (corona patients) आढळून आले. यातून गुरुवारीपासून २४ तासात २ हजार ३८५ एवढी घट झाल्याचे समोर आले. मुंबईत शनिवारपासून सुरु झालेली रुग्णघट शुक्रवारी देखील सुरुच होती.

मुंबईतील शुक्रवारच्या रुग्णनोंदीने मुंबईत आता एकूण रुग्णसंख्या ९,८१,३०६ झाली. तर काल २२,०७३ रुग्ण बरे झाले असल्याचे सांगण्यात आले. आता एकूण बरे झालेल्यांची संख्या ८,७७,८८४ झाली. तसेच शुक्रवारी ९ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या १६,४३५ झाली.

दरम्यान, मुंबईत सध्या ८४,३५२ सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ८९ टक्के एवढा आहे. तसेच कोविड रुग्णवाढीचा दर १.७४ टक्क्यांवर आला आहे. रुग्णदुपटीचा कालावधी ३९ दिवसांवर आला असून शुक्रवारी दिवसभरात ५४,९२४ चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे मुंबईत आतापर्यंत १,४५,१०,४३८ एकूण चाचण्या करण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले.

राज्यात २३८ ओमिक्रॉन रुग्णांची नोंद

राज्यात दिवसभरात २३८ ओमिक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण (Omicron patients) रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (IIER) यांनी रिपोर्ट केले आहेत. रुग्णांच्या तपशीलानुसार पुणे मनपा १९७, पिंपरी चिंचवड ३२, पुणे ग्रामीण आणि नवी मुंबई प्रत्येकी ३, तर मुंबईतून २, अकोला १ असे सांगण्यात आले.

आता राज्यात एकूण १६०५ ओमिक्रॉन विषाणू बाधित रुग्णांची संख्या झाली आहे. यापैकी ८५९ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी (RTPCR test) निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ४६४१ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी (Genome Sequencing) पाठविण्यात आले आहेत. यापैकी ८३ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here