@maharashtracity

मुंबई: एम/ पूर्व विभागातील बी.डी. पाटील मार्गावरील ‘ओव्हर हेड’ वायर भूमिगत करण्यासाठी मुंबई महापालिका (BMC) मे.टाटा पॉवर कंपनीला ‘फक्त’ ३ कोटी ५ लाख रुपये मोजणार आहे.

यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. मात्र, ओव्हरहेड वायर भूमिगत करण्यासाठी ३ कोटी रुपयांचा खर्च योग्य की अयोग्य याबाबत स्थायी समितीत विरोधक व भाजप यांच्याकडून कदाचित विरोध होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

एम/ पूर्व विभागातील बी.डी. पाटील मार्गावरील ‘ओव्हर हेड’ वायर ही धोकादायक व आरोग्याला हानिकारक स्थितीत असल्याने ही ओव्हर हेड वायर तातडीने हटवून तिला भूमिगत करण्यासाठी पालिका रस्ते विभागाचे उप प्रमुख अभियंता ( पूर्व उपनगते) यांनी, मे. टाटा पॉवर कंपनीकडून (Tata Power Company) हे काम करवून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यासाठी टेंडर काढण्याची गरज नसल्याचे मत संबंधित पालिका अधिकारी यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आता ओव्हर हेड वायर भूमिगत करण्याचे कंत्राटकाम मे. टाटा पॉवर कंपनीला देण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here