@maharashtracity

मुंबई: मुलुंड (प.), केशव पाडा, कालिदास नाट्य मंदिर, जेनेट टॉवर नजीक वीज मिटर बॉक्समध्ये शॉर्टसर्किटमुळे (short circuit) आग लागल्याची घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली. आगीत केबल वायर जळाल्याने (cable wire gutted in fire) मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला होता.

आग लागल्यावर परिसरात खळबळ उडाली. काही नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने (fire brigade) तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य युद्धपातळीवर सुरू केले.

सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. अग्निशमन दलाने २ फायर इंजिनच्या साहाय्याने या आगीवर अवघ्या २० मिनिटात नियंत्रण मिळवले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here