@maharashtracity

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर टाळाटाळ नको मुंबई महानगरपालिकेची भुमिका

मुंबई: मुंबईत १.७६ कोटी लोकांनी पहिला डोस घेतला. मात्र दुसरा डोस घेताना टाळाटाळ केली असल्याची दिसून येत आहे. ५९ टक्के पुरुषांनी ४१ टक्के महिलांनी दुसरा डोस घेतले असल्याचे समोर येत आहे. ओमिक्रॉनच्या (Omicron) पार्श्वभूमीवर ही टाळाटाळ लक्षात घेऊन लसीकरणाचा (vaccination) पाठपुरावा केला जात आहे. आता त्यासाठी नव्या पंचसुत्रीचा अवलंब केला जात असल्याचे मुंबई महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

या अधिकाऱ्याने सांगितले की, लसीकरणावाचून राहिलेल्या लोकांचे लसीकरण ‘हर घर दस्तक’ (Har Ghar Dastak) उपकमातून प्रत्येकाच्या नावांची यादी तयार करण्यात आली आहे. यात दुसरा डोस घेतलेल्यांचा कालावधी आला असूनही डोस घेतला नसलेल्याची नावे असल्याचे तो अधिकारी म्हणाला.

शिवाय लस न घेतलेल्यांच्या घराच्या जवळ लसीकरण केंद्रातून लस दिली जात आहे. पंचसुत्रीच्या तिसऱ्या मुद्यानुसार लस लाभार्थी कामाला जाणारा असल्यास त्याच्या सोयीनुसार म्हणजे रात्री उशिरापर्यंत लस दिली जात आहे. त्याच सोबत प्रत्येक जिल्ह्यात कॉल सेंटर (Call Center) सुरु करण्यात आले असून या कॉल सेंटरमार्फत पाठपुरावा केला जात आहे.

शिवाय मोबाईल व्हॅनमार्फत (Mobile van) ऑन द स्पॉट लस (On the spot vaccination) दिली जात आहे. मुंबईच्या पाठोपाठ मुंबईतील वॉर रुममार्फत ही लसीकरणाचा पाठपुरावा केला जातो. अशी वॉर रुम प्रत्येक जिल्ह्यात उभारण्यात आली आहे.

लसीकरणाला प्रोत्साहन मिळावा यासाठी असा पाठपुरवा केला जात असल्याची माहिती त्या अधिकाऱ्याने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here