@maharashtracity

राज्यात ८०९ नवीन रुग्णांचे निदान

मुंबई: राज्यात सोमवारी ८०९ नवीन रुग्णांची नोंद झाली. या आठवडाभरात दुसऱ्यांदा कोरोना नोंद निच्चांकी झाली आहे. यां पूर्वी २५ ऑक्टोबर रोजी राज्यातील कोरोना रूग्ण संख्या ८८९ इतकी नोंदविण्यात आली होती. (Second tine lowest record of corona patients in a week)

सण उत्सवात कोविड वर्तणुकीचा अवलंब करण्याचा सल्ला राज्य कोरोना कृती समितीचे डॉ. अविनाश सुपे यांनी दिला. घटती कोरोना संख्या नक्कीच आशादायी बाब आहे. मात्र दिवाळीनंतरही अशीच घट सुरु राहिल्यास अधिक मुक्त होता येईल, असे सांगून डॉ सुपे यांनी कोरोना संपूर्ण गेला नसल्याचे भान ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले..

दरम्यान, आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,११,८८७ झाली आहे. सोमवारी १,९०१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६४,५२,४८६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले.

यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.५९% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १५,५५२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच राज्यात सोमवारी १० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली.

Also Read: एवाय.४.२ वेरियंटसाठी मुंबईत जिनोम सिक्वेसिंग

सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,२७,५२,६८७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,११,८८७ (१०.५४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात १,६०,४३२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home quarantine)आहेत तर ९३३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत दिवसभरात २५८

मुंबईत दिवसभरात २५८ नव्या कोरोना रुग्णांची (corona patients in Mumbai) नोंद करण्यात आली. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७५७००७ एवढी झाली आहे. तर ४ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आतापर्यंत १६२५१ मृत्यूची नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here