@maharashtracity

पालिकेकडून फिरत्या कृत्रिम तलावांची व्यवस्था
गणेशभक्तांनी विसर्जनासाठी गणेशमूर्ती पालिका कर्मचार्यांकडे सोपवावी

मुंबई: मुंबई शहर हे कोरोनाची तिसऱ्या लाटेच्या(third wave of corona) उंबरठ्यावर आहे. त्यामुळे गणेशोत्सवात (Ganesh Festival) कोरोना नियमांचे पालन करावे व गर्दी टाळावी विसर्जन स्थळी विधिवत गणेशमूर्ती विसर्जनासाठीही गर्दी न करता त्या मूर्ती पालिका कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द कराव्यात.

तसेच,गणेश मूर्तींचे विसर्जन नैसर्गिक विसर्जन स्थळी करण्यापेक्षा कृत्रिम तलावात (artificial pond) फिरत्या कृत्रिम तलावात अधिकाधिक प्रमाणात मूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी केले आहे.

मुंबई महापालिकेने (BMC) सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्याप्रमाणे गणेश भक्तांनी या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता तोंडाला मास्क लावणे, हात वारंवार व स्वच्छ करणे, सामाजिक अंतर राखणे या त्रिसूत्रीचे पालन प्रत्येकाने करावे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी आपण आपले, मित्रमंडळी, नातेवाईक व परिवार यांचे रक्षण करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे आवाहनही महापौर पेडणेकर यांनी केले आहे.

मुंबईतील प्रमुख नैसर्गिक विसर्जन स्थळांची महापौर पेडणेकर यांनी गुरुवारी पाहणी केली. पालिकेने गणेशमूर्ती विसर्जनासाठी केलेल्या पूर्व तयारीच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी, प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी वरीलप्रमाणे आवाहन केले आहे.

याप्रसंगी, गणेशोत्सवाची महत्वाची जबाबदारी असलेले उपायुक्त (परिमंडळ -२) हर्षद काळे, “डी” विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड, जी /उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

महापौर यांनी, गिरगाव चौपाटीपासून गणेश विसर्जन तयारीबाबत पालिकेने केलेल्या कामांच्या पाहणीला प्रारंभ केला. त्यानंतर त्यांनी दादर चौपाटी, माहीम चौपाटी याठिकाणीही भेट देऊन तेथील तयारी कामांचा संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.

नैसर्गिक चौपाट्या ज्यांच्या घराजवळ आहे त्या मंडळाने तसेच गणेश भक्तांनी महापालिकेने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे आपली गणेश मूर्ती महापालिका कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करावी. आपला विसर्जनाचा पाट तसेच वाळू आपल्याला त्वरित देण्यात येईल, जेणेकरून विसर्जनस्थळ आपल्याला पटकन मोकळे करता येईल, असेही महापौरांनी प्रतिपादन केले.

गिरगाव चौपाटी येथे दीडशे टेबलची गणेश मूर्ती स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गिरगाव चौपाटी येथे ज्याप्रमाणे विसर्जनासाठी संबंधित मंडळाने विभाग कार्यालयात नोंदणी केल्यानंतर विभाग कार्यालयाकडून जी वेळ मिळेल त्या वेळेत मंडळाने विसर्जन करावे. त्याप्रमाणे इतर चौपाट्यांवरही व्यवस्था करण्याचे निर्देश महापौरांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले. पालिकेने केलेल्या आवाहनाला मुंबईकर निश्चितच प्रतिसाद देतील,असा आशावाद महापौरांनी यावेळी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here