@maharashtracity

दादर, माहिमच्या तुलनेत धारावीत कोरोनाचे कमी रुग्ण

मुंबई: सध्या मुंबईत कोरोनावर पालिका आरोग्य यंत्रणेने चांगलेच नियंत्रण मिळवले आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत रुग्णांचे प्रमाण कमी आहे. दादर व माहिमच्या तुलनेत धारावीसारख्या झोपडपट्टीतही कोरोनाचे दैनंदिन रुग्ण प्रमाण आणि एकूण सक्रिय रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे धारावीकरांसाठी ही एक अत्यंत समाधानाची व दिलासा देणारी बाब आहे. (Good news for Dharavi, corona patients lesser in Dharavi than Dadar and Mahim)

मात्र याचे खरे श्रेय जी/ उत्तर वार्डाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर (Kiran Dighavkar) यांना दिले पाहिजे. त्यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी दिवसरात्र कष्ट घेतले आहेत. त्यांनी, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना, उपक्रम राबविले आहेत.

गेल्या २४ तासांत, दादर (Dadar) भागात कोरोनाची बाधा झालेले — ६ रुग्ण, त्यानंतर माहिम (Mahim) भागात कोरोनाचे – २ रुग्ण तर धारावी भागात फक्त – १ आढळून आल्याची नोंद दैनंदिन कोरोना अहवालात करण्यात आली आहे.

आतापर्यंत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे माहिम भागात – १० हजार ६२६ एवढे, दादर भागात १० हजार २९५ तर धारावी भागांत सर्वात कमी म्हणजे ७ हजार १२८ रुग्णांची नोंद झाली असून या तिन्ही भागात मिळून एकूण २८ हजार ४९ रुग्णांची नोंद झाली आहे.

त्याचप्रमाणें, माहिम भागातील १० हजार ६२६ रुग्णांपैकी १० हजार २७६ रुग्ण हे यशस्वी उपचारांमुळे कोरोनामुक्त झाले असून आता विविध रुग्णालयात ८९ रुग्ण सक्रिय असून उपचार घेत आहेत.

तसेच, दादर भागातील १० हजार २९५ रुग्णांपैकी ९ हजार ८८७ रुग्ण हे यशस्वी उपचारांमुळे कोरोनामुक्त झाले असून आता विविध रुग्णालयात १०५ रुग्ण सक्रिय असून ते उपचार घेत आहेत.

त्याचप्रमाणे, धारावी (Dharavi) भागातील ७ हजार १२८ रुग्णांपैकी ६ हजार ६८१ रुग्ण हे यशस्वी उपचारांमुळे कोरोनामुक्त झाले असून आता विविध रुग्णालयात फक्त ३० रुग्ण सक्रिय असून उपचार घेत आहेत.

वरील आकडेवारीवरून दादर व माहिम भागातील सक्रिय रुग्ण संख्येच्या तुलनेत धारावी भागातील सक्रिय रुग्ण संख्या फक्त ३० एवढी असल्याने धारावीकरांसाठी दिवाळीपूर्वी एक गोड बातमी आहे.

विभाग दैनंदिन रुग्ण सक्रिय रुग्ण

 दादर             ६                     १०५                                           

 माहिम            २                      ८९

 धारावी            १                      ३०

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here