@maharashtracity

मुंबई: मध्यवर्ती मार्ड (MARD) संघटनेकडून देण्यात आलेल्या बाधित डॉक्टरांच्या आकडेवारीनुसार राज्यातील कोरोनाने बाधित डाॅक्टरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात आतापर्यंत ३३६ निवासी डाॅक्टर बाधित (covid affected doctors) झाले.

दरम्यान, मुंबईतील बाधित डाॅक्टरांची संख्या अधिक आहे. माहितीनुसार मुंबईत सायन रुग्णालयात ९८ डाॅक्टर बाधित असून बाधितांमध्ये हे रुग्णालय आघाडीवर आहे. तर जे जे रुग्णालय ८४, केईएम ७०, नायर ४५ आणि कुपर रुग्णालयातील ७ डाॅक्टर मिळून मुंबईतून ३०४ डाॅक्टर आतापर्यंत बाधित झाले आहेत.

राज्यातील ३३६ निवासी डाॅक्टर कोरोनाबाधित झाल्याची माहिती निवासी डॉक्टरांची संस्था मध्यवर्ती मार्डचे अध्यक्ष डाॅ. अविनाश दहिफळे यांनी दिली

राज्यातील उर्वरित रुग्णालयातील बाधित डाॅक्टरांमध्ये लातूर १, यवतमाळ १, धुळे ८, मिरज २, नागपूर १, जीएमसी औरंगाबाद २, ठाणे १०, सोलापूर २, कोल्हापूर ०, बीजेजीएमसी, पुणे १०, नांदेड २, पिंपरी ३ असे असल्याचे सांगण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रूग्णांच्या दैनंदिन आकडेवारीत वाढ होत आहे. असे असताना काही रुग्णालयांमध्ये ओपीडी (OPD) तसेच सर्जरी विभागातील सेवा, यासह इलेक्टिव्ह सर्जरी (elective surgery) टप्प्याटप्प्याने कमी करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. संसर्ग नियंत्रणात येईपर्यंत तसेच मनुष्यबळाची पूर्ववत उपलब्धता होई पर्यंत हे विभाग पूर्ण क्षमतेने काम करणार नाहीत असेही सांगितले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here