@maharashtracity

१८७२ मध्ये पालिका स्थापनेसमयी ६४ नगरसेवक

२००२ ला २२१ वरून २२७ नगरसेवक

१९ वर्षांनंतर नगरसेवक संख्येत ९ ने वाढ होणाhiuर

मुंबई: मुंबई महापालिकेची (BMC) निवडणूक तोंडावर आलेली असताना राज्य सरकारने लोकसंख्या वाढीच्या आधारे मुंबईतील वॉर्डांच्या व नगरसेवकांच्या संख्येत ९ ने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेच्या इतिहासात पाचव्यांदा नगरसेवक संख्येत वाढ होणार आहे. (Increase in number of BMC wards for fifth time)

या निर्णयामुळे मुंबईतील नगरसेवकांची व वॉर्डांची संख्या २२७ वरून २३६ वर पोहोचणार आहे. वास्तविक, पालिकेत ५ नामनिर्देशित नगरसेवक सुद्धा आहेत. त्यामुळे आता सध्या २२७ नगरसेवक अधिक ५ नामनिर्देशित नगरसेवक, असे २३२ नगरसेवक आहेत. आता त्यात आणखीन ९ नगरसेवकांची भर पडल्यास ही संख्या थेट २३६ नगरसेवक अधिक ५ नामनिर्देशित नगरसेवक, अशी एकूण २४१ वर पोहोचणार आहे.

१८७२ पासून वार्ड, नगरसेवक संख्येत वाढ

मुंबई महापालिकेची स्थापना झाली त्यावेळी म्हणजे १८७२ मध्ये अगदी सुरुवातीला नगरसेवकांची संख्या फक्त ६४ एवढी होती. त्यानंतर आजपर्यंत चार वेळा वार्ड व नगरसेवकांच्या संख्येत वाढ झाली. आता पाचव्यांदा नगरसेवक व वॉर्डांच्या संख्येत वाढ होणार आहे.

मुंबईत १८७२ ला नगरसेवकांची संख्या ६४ असताना १९६३ ला (एक सदस्य प्रभाग रचना अंमलात आली) थेट ७६ ने वाढ होऊन ती संख्या १४० वर गेली. त्यानंतर पुन्हा १९८२ मध्ये म्हणजे १९ वर्षांनी वार्ड व नगरसेवक संख्येत मोठा बदल झाला. त्यावेळी अस्तित्वात असलेली वार्ड, नगरसेवक संख्या आणखीन ३० ने वाढविण्यात येऊन ती थेट १७० वर गेली.

Also Read: सायन रुग्णालयातील सुरक्षा रक्षक हल्ल्यात जखमी

सन १९८३ च्या सुमारास नगरसेवकांचा निवृत्तीचा कालावधी १ वर्षाने वाढविण्यात आला होता.

तसेच, १९८२ नंतर आणखीन ९ वर्षांनी म्हणजे १९९१ च्या सुमारास पालिकेतील वार्ड व नगरसेवकांच्या संख्येत थेट ५१ ने वाढ करण्यात आली. त्यामुळे त्यावेळी वार्ड व नगरसेवक संख्या थेट २२१ वर पोहोचली.

मात्र त्यानंतरही पुन्हा ११ वर्षांनी म्हणजे २००२ मध्ये त्यात बदल करण्यात आला. वार्ड व नगरसेवकांची संख्या आणखीन ६ ने वाढवून २२७ वर नेण्यात आली.

आता मुंबईतील वाढते शहरीकरण, वाढती लोकसंख्या पाहता १९ वर्षानंतर राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईतील वार्ड व नगरसेवक संख्या आणखीन ९ ने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मुंबईतील वार्ड व नगरसेवकांची संख्या थेट २३६ वर जाणार आहे. त्यात ५ नामनिर्देशित नगरसेवकही जोडीला असणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here