@maharashtracity

मुंबई: केईएम रुग्णालयातील (KEM Hospital) रूग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांना ग्रासणाऱ्या समस्यांसाठी शनिवारी केईएम रुग्णालय अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांची सार्वजनिक आरोग्य समिती सदस्या डॉ. सईदा खान यांनी भेट घेतली. यावेळी डॉ. देशमुख यांनी रुग्णांना देण्यात येणाऱ्या सुविधा आणि योजनांची माहिती दिली. तसेच सांगण्यात आलेल्या समस्या सोडविण्यात येणार असल्याचे ही सांगितले.

या बैठकीत आरोग्य समिती सदस्यां डॉ. सईदा खान, राष्ट्रवादी काँग्रेसचे वॉर्ड अध्यक्ष राजेश राणे, सुनील परब, जया सोलंकी, संतोष वराडकर आदी उपस्थित होते. आतापर्यंत रुग्ण ओपीडी विभागात आल्यावर त्यांना केसपेपरसाठी वेगळी रांग लावावी लागत असे. आता तसे न करता ओपीडीतच केसपेपर उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली.

तसेच उपचारादरम्यान रूग्णांना बऱ्याचशा चाचण्या बाहेरून करायला लागतात. हॉस्पिटलमधील मशीन बऱ्याच वेळा बंद असल्याचे कारण दिले जाते. यावर उपाय योजना कराव्यात असे सुचविण्यात आले.

बऱ्याच वेळा व्हिलचेअर, ट्रॉली मिळत नसल्याने नातेवाईकांना अडचण होत असते. व्हिल चेअर, ट्रॉली मिळाल्यास रुग्णाच्या नातेवाईकांना ती ढकलत न्यावी लागते. त्यासाठी हॉस्पिटलच्यावतीने मल्टीपर्पज कामगार नेमण्यात यावेत, अशी सूचना करण्यात आली.

हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णास रुग्णालयामार्फत पुरेसे मिडिसिन हि मिळत नाही. एखाद दुसरी गोळी सोडली तर बाकी बाहेरूनच घ्यावी लागते. त्या लागणाऱ्या मेडीसिन रुग्णालयाने उपलब्ध करून देण्यात यावेत,अशा मागण्या करण्यात आल्या.

आगामी १५ ते ३० दिवसात या समस्या सोडवण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले. तर ८ दिवसांत यातील काही समस्या सोडवल्या जातील, असे आश्वासन देण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे वॉर्ड अध्यक्ष राजेश राणे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here