@maharashtracity

मुंबई: मुंबईत शनिवारपासून पावसाला पुन्हा सुरूवात झाली असून पावसाळी आजारांच्या रुग्णात वाढ झाली असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून दिसत आहे. यात डेंग्यू (Dengue), मलेरियाचे (malaria) रूग्ण अधिक आहेत. एकट्या ऑगस्ट महिन्यात ७९० मलेरियाचे रूग्ण आढळून आले आहेत. तर डेंग्यूचे १३२ रुग्ण सापडले असून आतापर्यंत एकूण २०९ रुग्णांची नोंद झाली आहे.

दरम्यान, सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण एफ दक्षिण, बी आणि एच पश्चिम या वाॅर्ड मधून आढळले असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. जानेवारी ते ऑगस्टपर्यंत मलेरियाच्या ३३३८ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

या महिन्यात मलेरियासह गॅस्ट्रोच्या रुग्णांची नोंद असून रुग्ण त्रासले आहेत. आठ महिन्यांत १८४८ गॅस्ट्रोचे रुग्णांची (Gastro patient) नोंद झाली आहे. त्यामुळे लहानांना ओआरएस (ORS), डाळीचे पाणी, ताक यासारखे इतर द्रवपदार्थ देण्याचा सल्ला दिला जात आहे.

सर्दी आणि विषाणूंमुळे होणारा फ्ल्यू (Flu) हा थकवा, ताप आणि स्नांयुंमधील वेदना अशा लक्षणे दर्शविणारा असून साधारणपणे एका आठवड्यापेक्षा कमी काळ टिकतो. आजारी मूल इतर मुलांच्या संपर्कात येणार नाही याची खात्री पालकांनी करून घेणे आवश्यक आहे.

खोकताना किंवा शिंकताना वारंवार हात धुणे आणि तोंड आणि नाक झाकणे ही सध्याची गरज आहे. वाढलेली आर्द्रता, संसर्गाची वाढ आणि वातावरणातील परागकण यामुळे मुलांमध्ये एलर्जी आणि दम्याची स्थिती निर्माण होते.

जानेवारी महिन्या पासून मुंबईत मलेरियाचे ३३३८ रूग्ण, लेप्टोस्पायरोसिसचे (leptospirosis) १३३ रूग्ण, डेंग्यूचे २०९, गॅस्ट्रो आजाराचे १८४८, तर काविळीचे १७५ तसेच एच1एन 1 आजाराचे ४५ रूग्ण गेल्या आठ महिन्यात आढळले असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here