@maharashtracity

उपनगरात ४ मिमी पावसाची नोंद

मुंबई: पश्चिम उपनगरांत आज सकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. शनिवारी शहर, उपनगरासह एमएमआर (MMR) प्रदेशात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. शहरांत पावसाची नोंद (ट्रेस) झाली. तर उपनगरत ४ मिमी पावसाची नोंद झाली असल्याचे मुंबई वेधशाळेकडून सांगण्यात आले.

दरम्यान, काही ठिकाणी ढगाळ तर मुंबई बाहेर गडगडाट झाल्याचे समजत आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सायंकाळी गार वारे वाहू लागले होते. तसेच कमाल तापमान अनुक्रमे २९.० तर २७.०६ डिग्री सेल्सिअस एवढे घसरले. किमान तापमानही खाली सरकले. किमान तापमान एकोणीस अंश सेल्सियसवर नोंदवले गेले. थंडीचा प्रभाव आज जास्त राहण्याची शक्यता आहे.

सकाळपासून कांदिवली, बोरिवली, पवई, गोरेगाव, सांताक्रुज, दादर अशा बहुतांश परिसरात पावसाने हजेरी लावली. काही भागांत पावसाचा जोर आढळून आला.

दरम्यान, पावसामुळे सर्दी (cold) आणि खोकल्याचा (cough) त्रास बळावण्याची जोरदार शक्यता आहे. अगोदरच व्हरायल इन्फेक्शनची (Viral infection) साथ असताना पावसामुळे मुंबईकरांच्या आजारपणात भर पडेल. कोरोनाचेही (corona) थैमान सुरु असताना मुंबईकरांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

विशेषतः दमेकरी रुग्णांनी काळजी घ्यावी, कारण वातावरणात अचानक बदल झाल्यास दमेकरी रुग्णांना अगोदर त्रास होतो, असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here