@maharashtracity

राज्यात कोरोना रुग्णसंख्या घटतेय

‘या’ जिल्ह्यात दुसऱ्या लाटेचा अद्याप हि त्रासच

मुंबई: राज्यातील कोरोना रुग्णसंख्या घटताना दिसून येत असून दुसरी लाट नियंत्रणात येत असल्याचे दिलासादायी चित्र आहे. राज्यात २९ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरपर्यंत या कालावधीत २० टक्के घट झाली आहे (decline in covid patients in state by 20 percent).

मात्र, याच कालावधीत मुंबईतील रुग्णांमध्ये मात्र १९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबई जिल्ह्यासह सिंधुदुर्ग, नगर या जिल्ह्यात रुग्ण संख्या जैसे थे स्थितीत आहेत.

दरम्यान, मे महिन्यात राज्यात २३ ते २५ हजारांच्या संख्येत रुग्ण सापडत होते. सध्या रुग्ण संख्या २ हजाराच्या घरात आली आहे. म्हणजेच गेल्या सहा महिन्यांपासून राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत ९० टक्क्यांनी घटली आहे.

त्याउलट मुंबईतील स्थिती आहे. गेल्या एका आठवड्यातच २० टक्क्यांनी रुग्णात भर पडली आहे. राज्यात २२ एप्रिल या दिवशी सर्वाधिक ६७ हजार १३ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. मात्र, आता रुग्णसंख्या 2 हजाराच्या घरात आहे.

मुंबईत ११ एप्रिल या दिवशी ११ हजार २० सर्वाधिक रुग्ण आढळले होते. तर आता ४०० ते ५०० च्या घरात दररोज नव्या कोरोना रुग्णांची नोंद होते आहे.

दरम्यान, राज्यातील अहमदनगर आणि सिंधूदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये जास्त काळजी घेण्याची गरज असल्याचेही टास्क फोर्स सदस्यांकडून सांगण्यात आले आहे.

रुग्ण संख्येत चढ उतार दिसून आला तरी दुसरी लाट संपली असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. राज्यात अहमदनगर जिल्हा सोडल्यास बाकी इतर ठिकाणी तसे काळजीचे वातावरण नाही. तरीही नागरिकांनी बेफिकिरिने वागू नये असे राज्याच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले. (Ahmednagar is still in danger zone)

राज्य टास्क फोर्स (Task Force) सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले कि, थोडाफार चढ-उतार दिसला तरी काळजीचे कारण नाही. सध्याची परिस्थिती नियंत्रणात आणू शकतो. राज्यातील काही जिल्हे जसे की अहमदनगर किंवा सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये जास्त काळजी घेण्याची गरज असल्याचे डॉ . पंडित म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here