@maharashtracity

मुंबईत १०.८६ टक्के सक्रिय रुग्ण

मुंबई: मुंबईत कोरोना रूग्ण संख्या सतत घटत असताना आरोग्य विभागाच्या साप्ताहिक अहवालातून मुंबई सक्रिय रुग्णाच्या (active patients in Mumbai) यादीत पाचव्या क्रमांकावरून चवथ्या क्रमांकावर आली असल्याची माहिती समोर आली.

हा अहवाल १४ सप्टेंबरपर्यंतचा आहे. रूग्ण संख्या घट होण्यात मुंबई राज्यात आघाडीवर आहे. मात्र नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या साप्ताहिक अहवालातून सक्रिय रुग्ण क्रमांक कमी झाल्याने चिंता वाढली आहे.

दरम्यान, मुंबईच्या आधी पुणे, ठाणे आणि अहमदनगर हे तीन जिल्हे आहेत. या जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची टक्केवारी अनुक्रमे २६.३८, १४.६० आणि १३.८९ टक्के अशी आहे. या तीन जिल्ह्यानंतर मुंबई जिल्ह्याचा चवथा क्रमांक येत असून मुंबईत १०.८६ टक्के सक्रिय रूग्ण असल्याचे साप्ताहिक अहवाल सांगतो.

मुंबई जिल्ह्यानंतर सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि नाशिक असे सहा जिल्हे आहेत. यात अनुक्रमे ९.०१, ५.५५, ४.०६, २.३६, २.३३, १.८९ टक्के सक्रिय रूग्ण आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here