@maharashtracity

२९,५०० खाटा रिक्त
२,२५५ सक्रिय रुग्ण घरीच क्वारंटाईन

मुंबई: मुंबई महापालिकेने (BMC) केलेल्या विविध उपाययोजनांमुळे कोरोनाची (Corona) दुसरी लाट आटोक्यात आली आहे. मुंबईतील विविध रुग्णालयात फक्त ५०० रुग्ण खाटांवर उपचार घेत आहेत. तर उर्वरित २९ हजार ५०० खाटा रिक्त आहेत. तसेच, कोरोना बाधित २,२५५ सक्रिय रुग्ण घरीच क्वारंटाईन (Home Quarantine) होऊन उपचार घेत आहेत. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही बाब काहीशी दिलासादायक आहे.

मुंबई महापालिकेने गेल्या मार्च २०२० पासून कोरोनाबाबत सतर्कता दाखवत वेळोवेळी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्याने आणि कोरोना संदर्भातील नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केल्याने कोरोनाची पहिली आणि दुसरी लाटही आटोक्यात आली आहे.

आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत पालिकेने सर्व यंत्रणा दुसज्ज केली आहे. त्यातच सध्या स्थितीत कोरोनाचे फक्त ५०० रुग्णच विविध रुग्णालयात उपचार घेत असल्याने २९ हजार ५०० खाटा या रिक्त आहेत. तसेच, जे काही सक्रिय रुग्ण आहेत ते गंभीर स्वरूपाचे नसल्याने घरीच क्वारंटाईन होऊन उपचार घेत असल्याने सध्या तरी पालिकेची चिंता काहीशी कमी झाली आहे.

मात्र मुंबईत सद्यस्थितीत रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्के असून आठवड्याचा रुग्णवाढीचा दर ०.०४ टक्के झाला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी १ हजार ८८४ दिवसांवर पोहोचला आहे.

तसेच, मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात (Seven Hills Hospital) ३७० रुग्ण, बीकेसीत (BKC) ८, मुलुंड (Mulund) ३८, नेस्को फेज १ मध्ये १६ रुग्ण, फेज २ मध्ये २ रुग्ण, एनएससीआय (NSCI) ३५ असे रुग्ण उपचार घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here