@maharashtracity

मुंबई: मुंबईत कोरोना गाशा गुंडाळताना दिसून येत असला तरी साथ रोगाची दहशत वाढत आहे. गेल्या 7 दिवसांत मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रोच्या रुग्ण संख्येत दुपटीने वाढ झाली आहे.

दिनांक 7 ते 14 नोव्हेंबर दरम्यान मलेरियाचे 80, डेंग्यू – 23, गॅस्ट्रो -72 , चिकनगुनीया – 7 तर लेप्टोचे 4 रुग्ण आढळले. यामुळे मुंबईत मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रोचे टेंशन वाढत असल्याचे दिसून येत आहे. (Spike in Malaria, Dengue, gastro patients in Mumbai)

मुंबई पालिकेला कोरोनाची पहिली व दुसरी लाट रोखण्यात यश आले. तर तिसरी लाटेची तीव्रता लसीकरणाने कमी करण्यात येत आहे. मात्र पावसाळ्यात उद्भवणारे साथीच्या आजारांचे संकट आजही कायम आहे. त्यामुळे कोरोनाला हरवण्यासाठी ज्या पद्धतीने खबरदारी घेतली त्याचप्रमाणे साथीच्या आजार रोखण्यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

7 ते 14 नोव्हेंबरची आकडेवारी
मलेरिया – 152
डेंग्यू – 70
गॅस्ट्रो – 121
कावीळ – 13
चिकनगुनीया – 9
लेप्टो – 4
स्वाईन फ्ल्यू – 0

१ ते ७ नोव्हेंबरची आकडेवारी!
मलेरिया – 72
डेंग्यू – 47
गॅस्ट्रो – 49
कावीळ – 6
चिकनगुनीया – 6
लेप्टो – 1
स्वाईन फ्ल्यू – 1

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here