@maharashtracity

त्यांच्या देखभालीसाठीच १५ कोटींचा खर्च महापौर

मुंबई: मुंबईकरांना पेंग्विनचे (Penguin in Ranicha baug) दर्शन जवळून घडविण्यासाठी राणीच्या बागेत पेंग्विन परदेशातून आणण्यात आले. या पेंग्विनचे आगमन होण्यापूर्वी राणी बागेचे उत्पन्न वर्षाला ७० लाख एवढे होते. मात्र पेंग्विन आणल्यानंतर ते उत्पन्न ५ कोटी ६७ लाख रुपयांवर गेले आहे. या पेंग्विनमुळेच उत्पन्नात वाढ झाली आहे. त्यामुळे या पेंग्विनच्या देखभालीवर ३ वर्षासाठी १५ कोटी रुपये खर्च करण्याबाबतचे टेंडर काढण्यात आले आहे.

या टेंडरबाबत जरी विरोधकांकडून नकारात्मक सूर आळवला जात असला तरी या पेंग्विनच्या देखभालीसंदर्भात कोणतीही तडजोड करता येणार नाही. जोखीम घेता येणार नाही. त्यामुळेच विरोधकांना काहीही म्हणू द्या, पेंग्विनबाबतचे १५ कोटींचे टेंडर मागे घेतलेले नाही. तसेच, या टेंडर प्रक्रियेत कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत, असे महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी ठामपणे सांगितले आहे.

राणीच्या बागेत पेंग्विनसंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी वरीलप्रमाणे सत्ताधारी पक्षाची भूमिका जाहीर करीत विरोधकांना चपराक देण्याचा प्रयत्न केला आहे.

पेंग्विनमुळेच उत्पन्नात वाढ झालेली असल्याने त्यांच्यावर वर्षाला साडेचार ते पाच लाख रुपये खर्च करण्याबाबत कोणतीही तडजोड करता येणार नाही. या पेंग्विनमुळे व राणी बागेतील इतर प्राण्यांमुळे पर्यटकांच्या तोंडावर आनंद बघायला मिळतो. ह्या आनंदासमोर या पेंग्विनवरील खर्चाबाबत वेगळा विचार करता येणार नाही, असे महापौरांनी ठामपणे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here