@maharashtracity

भारतीय हवामान विभागाचा इशारा

मुंबई: बंगालच्या उपसागरातील (Bay of Bengal) कमी दाबाचे क्षेत्र रविवारी आणखी तीव्र झाले. त्यामुळे आगामी २४ तासात हा कमी दाबाचा पट्टा अजून तीव्र होण्याची शक्यता वर्तवली आहे. हा पट्टा आतल्या दिशेने पश्चिम तसेच वायव्य दिशेला सरकण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या परिणामातून राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर पुढचे ३ ते ४ दिवस जोरदार वारे सक्रिय राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभाग शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले. यातून मुंबई सह राज्यात दोन दिवस मुसळधारेचे राहणार आहेत.

दरम्यान, मुंबई (Mumbai), पालघर (Palghar), ठाणे (Thane), रायगड (Raigad) जिल्ह्यात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर घाट भागात पण जोरदार प्रभाव राहणार आहे. राज्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता आहे. याच परिणामातून कोकणात (Konkan) व मध्य महाराष्ट्रात (Central Maharashtra) याचा प्रभाव अधिक राहणार आहे.

सोमवार आणि मंगळवारी जोरदार पावसाची शक्यता :

कोकण, गोवा, विदर्भसहित नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात येथे सोमवार व मंगळवार दि.१३-१४ ला जोरदार पावसाची शक्यता जाणवते. तर मराठवाड्यात मात्र पावसाचा जोर काहीसा कमी राहणार आहे.

खान्देशसहित नाशिक जिल्ह्यात कसमादे पट्ट्यातही जोरदार पावसाची शक्यता असल्याचे निवृत्त हवामान विभाग शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here