@maharashtracity

मुंबई: मुंबईत २६ जुलै २००५ ला अतिवृष्टी झाल्याने व मिठी नदीला पूर आल्याने मोठी जीवित व वित्तीय हानी झाली होती. त्यातून धडा घेऊन पालिकेने ब्रिमस्टोवॅड अहवालावरून नद्या, नाले यांचे खोलीकरण, रुंदीकरण, पावसाळ्यात साचणार्या पाण्याचे जलदगतीने निचरा करण्यासाठी पंपिंग ८ पैकी ६ ठिकाणी पंपिंग स्टेशन उभारण्यात आले.

या ब्रिमस्टोवॅड कामाच्या अंतर्गत ५८ कामे हाती घेण्यात आली. त्यापैकी आजपर्यंत ४२ कामे पूर्ण झाली असून १३ कामे प्रगतीपथावर आहेत. ३ कामे अद्यापही सुरू आहेत. ही सर्व कामे पूर्ण झाल्यावर मुंबईकरांना पावसाळ्यात काहीसा दिलासा मिळणार आहे.

मिठी नदी पुनरुज्जीवन व पूर नियंत्रणासाठी ५६५ कोटींची तरतूद

२६ जुलै २००५ रोजी मिठी नदीला मोठा पूर येऊन मुंबईची तुंबई झाल्यावर पालिका प्रशासन जागे झाले. या मिठी नदीची विकासकामे हाती घेण्यात आली. या मिठी नदीचे रुंदीकरण, खोलीकरण यांची ९५% कामे पूर्ण झाली असून संरक्षक भिंत बांधण्याची कामे ८०% पूर्ण झाली आहेत.

त्यामुळे मिठी नदीची धारण क्षमता व वहन क्षमता वाढली. मिठी नदीची चार टप्प्यात कामे होत आहेत. त्यासाठी या अर्थसंकल्पात ५६५ कोटींची तरतूद करण्यात आली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here