@maharashtracity

कुलाबा ३२.४ तर सांताक्रूझ ७८.४ मिमी पावसाची नोंद

मुंबई: मुंबईवर शनिवारपासून सुरु झालेल्या ढगाळ वातावरणाचा परिणाम रविवारी आणि सोमवारी दिसून आला. सोमवारी रात्रीपासून पावसाने रिपरिप सुरु केली. मंगळवारी पावसाच्या सरी कायम होती. बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाला अनुकूल स्थिती निर्माण झाली असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आले. यामुळे रायगड (Raigad), ठाणे (Thane), मुंबई (Mumbai) आणि पालघर (Palghar) जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. आगामी चोवीस तासात हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या तर काही ठिकाणी जोरदार सरी कोसळण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.

मंगळवारी मुंबई शहर तसेच उपनगरात पावसाच्या सरी कोसळल्या. दुपारनंतर संततधार सुरु होती. कुलाबा ३२.४ तर सांताक्रूझ ७८.४ मिमी एवधी पावसाची नोंद करण्यात आली. तर
दिवसभर आकाश ढगाळलेल्या स्थितीत होते.

शहर आणि उपनगरात पावसाच्या हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या सरी सुरु आहेत. गेल्या चोवीस तासांच शहर येथे ४६.४२ मि. मी., पूर्व उपनगरे ३३.०२ व पश्चिम उपनगरे येथे ३९.२४ मि.मी. इतक्या पावसाची पालिकेच्या पर्जन्यमापक केंद्रावर नोंद झाली.

तर कुर्ला आणि मालाड या ठिकाणी दरडी कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या. यात एक जण जखमी असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिली. तर मालाडच्या पूर्वेस असलेल्या कुरार व्हिलेज येथील आंबेडकर नगरात दरड कोसळल्याने येथील सुमारे १०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

सकाळी पावणे अकराच्या सुमारास सकिनाका कुर्ला या ठिकाणी दरडींचा काही भाग कोसळला. त्यात एकजण जखमी झाला असून जखमीला राजावाडी रुगणालयात उपचार करून सोडून देण्यात आले.

अंदाज

मुंबई (Mumbai) शहर आणि उपनगरात काही भागांत मध्यम तर काही भागात जोरदार आणि अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

प्रतिक्रिया :
रविवारपासून राज्यात चांगल्या प्रकारे पाऊस होत आहे. शीअर झोन तयार झाला असल्याने राज्यात पावसाने हजेरी लावली. या शीअर झोनचे मंगळवारी कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर झाले. याच प्रभावाने पालघर, ठाणे, मुंबई परिसरात चांगल्या प्रकारे पाऊस झाला. पुणे आणि नगर परिसरातदेखील याचा प्रभाव दिसून आला.

  • शास्त्रज्ञ शुभांगी भुते
    मुंबई वेधशाळा,
    भारतीय हवामान विभाग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here