@maharashtracity

अवजड उद्योग विभाग सचिव यांची सूचना

बेस्ट उपक्रमाचे केंद्र सरकारकडून कौतूक

मुंबई: मुंबई महापालिकेची (BMC) अंगभूत संस्था असलेल्या बेस्ट उपक्रमाने (BEST Undertaking) बेस्टच्या ताफ्यात १०० टक्के इलेक्ट्रिक बसगाड्या (electric buses) आणि दुमजली एसी बस (AC Buses) गाड्यांचा ताफा वाढविण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला आहे. तसेच, बेस्ट उपक्रमाने ‘चलो अँप’ (Chalo App) आणि ‘स्मार्ट कार्ड’ (Smart Card) पद्धत सुरू केली आहे. ही कौतुकास्पद बाब असून देशातील इतर सार्वजनिक उपक्रमांनी त्याचे अनुकरण करावे, अशी सूचना केंद्रातील अवजड उद्योग विभाग (Heavy Industries department) सचिव अरुण गोयल यांनी केली आहे.

गोयल यांनी मंगळवारी बेस्ट उपक्रमाच्या कुलाबा, इलेक्ट्रिक हाऊस येथील मुख्य कार्यालयाला भेट देऊन बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा व बेस्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत केंद्राच्या, ‘फेम -२’ योजनेसंदर्भात एक आढावा बैठक घेतली.

त्यावेळी त्यांनी बेस्टच्या चांगल्या योजना व धोरणात्मक निर्णयांबाबत गौरवोद्गार काढून बेस्टचे खास कौतुक केले.

यावेळी, केंद्र सरकारच्या ‘फेम -२’ योजनेची मुंबई (Mumbai), नवी मुंबई (Navi Mumbai), सोलापूर (Solapur), पुणे (Pune), नाशिक (Nashik) व नागपूर (Nagpur) यांसारख्या शहरात अंमलबाजवणी करण्यासाठी अरुण गोयल यांनी मुंबईतील बेस्टच्या कुलाबा येथील इलेक्ट्रिक हाऊसमध्ये (Electric House, Colaba) ऑनलाईन बैठक घेतली.

या बैठकीला बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा, नवी मुंबई महापालिका आयुक्त, बेस्टचे वरिष्ठ अधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीनंतर अरुण गोयल यांनी बेस्टच्या बॅकबे बस आगाराच्या (Bakcbay Depot) ठिकाणी भेट देऊन बस गाड्यांचे प्रवर्तन, इलेक्ट्रिक बस चार्जिंग पॉईंट सुविधा आणि बेस्टच्या बस ताफ्यात समाविष्ट करण्यात येणाऱ्या दुमजली एसी बसगाड्यांबाबत आवश्यक माहिती जाणून घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here