@maharashtracity

मुंबई: सायन येथील पालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयातील (Sion hospital) सुरक्षा रक्षकावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. यात सुरक्षा रक्षक जखमी झाले. हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले आहे. (Attack on security guard)

हल्लेखोर मनोरुग्ण असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. इतर सुरक्षा रक्षकांनी वेळीच गांभीर्य ओळखून त्या हल्लेखोराला पकडले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

दरम्यान, हल्ल्याची घटना शनिवारी घडली असून जयप्रकाश बोरजी (४७) या सुरक्षा रक्षकावर त्या व्यक्तीने पाठीमागून येऊन फावड्याने हल्ला केला असल्याचे एका सुरक्षा रक्षकाने सांगितले.

Also Read: मुख्यमंत्री मानेच्या दुखण्याने त्रस्त; रुग्णालयात दाखल

तो हल्लेखोर रुग्णालय परिसरातील इतर लोकांच्या देखील मागे लागला. मात्र इतर सुरक्षा रक्षकांनी त्वरीत त्याला ताब्यात घेतले. हल्ल्यात बोरजी यांच्या डोक्याला आणि हाताला जबर जखम झाली. उपचार करताना डोक्यावर वीस तर उजव्या हाताला आठ टाके पडले असल्याचे सांगण्यात आले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here