@maharashtracity

तज्ज्ञांचा इशारा ठरतोय खरा

मुंबई: गेल्या दहा दिवसात मुंबईतील (Mumbai) कोरोना रूग्ण (corona patient) संख्या वाढताना दिसून येत आहे. १६ ऑगस्ट रोजी मुंबईतील कोरोना रूग्ण संख्या १९५
एवढी नोंदविण्यात आली. तर बुधवारी २५ ऑगस्ट रोजी मुंबईत दिवसभरात ३४२ कोरोना रूग्ण नोंदविण्यात आले. गेल्या दहा दिवसात ही वाढ सुमारे दुप्पट असल्याचे दिसून येत आहे. यावर नागरिकांनी मास्क (mask), सोशल डिस्टंसिंग (social distancing) पाळणे आवश्यक असल्याचे कोरोना टास्क फोर्स (taka force) सदस्यांनी सांगितले.

कोरोना टास्क फोर्स सदस्यांच्या मते शिथिलता वाढवत असताना रूग्णवाढ देखील अपेक्षित आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी कोविड वर्तणूक पाळणे आवश्यक आहे. त्या शिवाय कोविडला पूर्ण मज्जाव होऊच शकत नाही, असे मत व्यक्त करण्यात आले.

दिनांक १५ ऑगस्टपासून दोन डोस लाभार्थ्यांना लोकल प्रवास खुला करण्यात आला. तत्पूर्वी देखील शिथिलीकरणाचे निर्णय घेण्यात येत होते. मात्र शिथिलीकरण होत असताना सर्वसामान्यांकडून कोविड वर्तणूक पाळली जात नसल्याचे वारंवार समोर येत आहे. त्याचा परिणाम आज रूग्ण संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, मुंबईत चाचण्या देखील वाढविण्यात आल्या आहेत. यातून कोरोना ही महामारी असल्याने रूग्ण वाढ होणार असल्याचे ही सांगण्यात येत आहे. यासाठी कोविड वर्तणूक कसोशीने पाळणे, मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंग ठेवणे आणि लवकरात लवकर लस घेणे आवश्यक असल्याचे कोविड कृती समिती सदस्य डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.

रुग्णवाढ

दिनांक रुग्णसंख्या

१६ ऑगस्ट १९५
१७ ऑगस्ट १९६
१९ ऑगस्ट २८२
१८ ऑगस्ट २८५
२२ ऑगस्ट २९४
२३ ऑगस्ट २२५
२४ ऑगस्ट २७२
२५ ऑगस्ट ३४२

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here