@maharashtracity

ज्येष्ठ पत्रकार योगेश वसंत त्रिवेदी यांची मुंबईच्या महापौरांकडे मागणी

मुंबई: मला मिळालेला पुरस्कार हा मुंबईच्या सव्वा कोटी जनतेचा असून हा पुरस्कार मी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे लाडके, लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना अर्पण करीत आहे, असे कृतज्ञतेचे उद्गार मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी आज काढले.

नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स, महाराष्ट्र तर्फे गेल्या दोन वर्षात कोरोनाविरोधात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल व धाडसी नेतृत्वाबद्दल मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी (Yogesh Trivedi) यांच्या हस्ते शिवालय येथील एका छोटेखानी कौटुंबिक वातावरणात शाल, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

एनयुजेमहाराष्ट्र अध्यक्ष शीतल करदेकर, अभिनेत्री अर्चना नेवरेकर, सामाजिक कार्यकर्त्या जॉय भोसले, पदाधिकारी संदिप टक्के, स्वप्नील शिंदे, अनिल गुरव, महेश चौगुले, संतोष राजदेव, राजू येरुणकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
दोन वर्षापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची तर मी महापौर पदाची जबाबदारी स्वीकारली. योगायोगाने कोविड-१९ (covid-19) त्याचवेळी सुरु झाला आणि नियतीने आमच्यावर मुंबई महाराष्ट्राची जबाबदारी सोपवली.

बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांच्या स्वभावाचा सुंदर मिलाफ उद्धव ठाकरे यांच्या ठायी असल्याने त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कोविडवर आपण मात करु शकलो. मुंबईकरांनी मला संपूर्ण साथ दिली. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी वहिनींच्या मार्गदर्शनामुळे मला काम करणे शक्य झाले, असे महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

ओमायक्रॉनचा (Omicron) धोका कमी झाला असला तरी डेल्टा व्हायरसचा (Delta virus) संसर्ग लक्षात घ्यावा लागेल. काळजी घ्या आणि सर्वच नियम काटेकोर पणे पाळा, असे माझे मुंबईकरांना आवाहन आहे, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या भाषणात सांगितले.

योगेश वसंत त्रिवेदी म्हणाले, पत्रकारितेत आपण ज्यांच्यामुळे आहोत ते आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर (Balshastri Jambhekar) यांचे मुंबईत भव्य स्मारक उभे रहावे आणि महापौर किशोरीताई यांनी यासाठी पुढाकार घ्यावा तसेच सर्वच पत्रकार संघटनांनी त्यांच्या पाठीशी एकजुटीने उभे रहावे, असे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here