@maharashtracity

मुंबई: ताडदेव येथील ग्वालिया टँक जवळच्या कमला या इमारतीला लागलेल्या आगीत जखमी झालेल्या रुग्णांना दाखल करून घेण्यास नकार देणाऱ्या व्होकार्ट (Wockhardt Hospital), रिलायन्स (Reliance Hospital) आणि मसिना (Masina Hospital) या रुग्णालयांवर कारवाई करण्याचे संकेत मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पडणे यांनी दिले आहेत.

कमला या २० मजली इमारतीच्या १९ व्या मजल्यावर शनिवारी सकाळी पावणे सातच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत ६ जणांचा मृत्यू झाला. तर २९ जण जखमी झाले आहेत.

हितेश मिस्त्री, मंजूबेन कथारिया आणि पुरुषाेत्तम चाेपडेकर यांच्यासह तीन अनोळखी महिला या आगीत भाजल्याने आणि धुरामुळे श्वास गुदमरून (suffocation) मृत्यू पावले.

दरम्यान, आगीत जखमी झालेल्या रुग्णांना व्होकार्ट, रिलायन्स आणि मसिना या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले असता त्यांना दाखल करून घेण्यास संबंधित रुग्णालयांनी नकार दिला. याबाबत संताप व्यक्त केला जातो आहे. संबंधित रुग्णालयाची दखल शासन पातळीवर घेण्यात आली असून याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

राज्य सरकारकडून पाच लाखाची मदत

राज्य सरकारकडूनही ताडदेव दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. दुर्घटनेतील जखमींवर महापालिका रुग्णालयात मोफत उपचार केले जाणार आहेत.

केंद्र सरकारकडून मदत

दुर्घटनेतील मृत व्यक्ती आणि जखमींच्या मदतीसाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) या दुर्घटनेनंतर काही तासांतच मृत आणि जखमींना आर्थिक मदत (ex-gratia) जाहीर केली. त्यानुसार या दुर्घटनेतील मृत पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे. तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.

त्या रुग्णालयांवर कारवाई करणार – महापौर

कमला इमारत दुर्घटनेनंतर महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) आणि मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या दुर्घटनेनंतर नजीकच असलेल्या मसिना, रिलायन्स आणि व्होकार्ट रुग्णालयाने जखमींवर उपचार करण्यास नकार दिला होता. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. महापौर किशोरी पेडणेकर यांनी या तीन्ही रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, आगीत जखमी रुग्णांपैकी सर्वाधिक जखमी जवळच्या भाटिया हॉस्पिटलमध्ये (Bhatia Hospital) दाखल झाले होते. यात ही 12 रुग्णांपैकी सहा गंभीर आहेत. त्यांना आयसीयूमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. वॉर्डात दाखल इतर 6 रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. जास्त धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

“कमला इमारत आगीच्या घटनेतील २० रुग्णांना भाटिया हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. निवासी वैद्यकीय डॉक्टरांनी टिम सहित त्वरित उपचार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे जखमींचे जीव वाचविण्यात मदत झाली. त्यापैकी पाच जणांवर अपघात विभागात उपचार करून त्यांना घरी जाण्यास परवानगी देण्यात आली. एकाला मृत आणण्यात आले. गंभीर भाजलेल्या दोन रुग्णांना कस्तुरबा आणि मसिना रुग्णालयात हलवण्यात आले.”

  • डॉ सत्यदेव मलिक, सीईओ, भाटिया हॉस्पिटल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here