@maharashtracity

मुंबई: पालिका आरोग्य यंत्रणा, साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी गेल्या एका महिन्यात केलेल्या विविध उपाययोजनांमुळे दादर, धारावी व माहिम या तीन विभागात कोरोनाबाधित सक्रिय रुग्णांची संख्या २३५ वरून थेट ९३ वर घसरली आहे. तब्बल १४२ ने म्हणजेच ६०% ने रुग्ण संख्येत घट झाली आहे.

त्यामुळे दादर (Dadar), धारावी (Dharavi)आणि माहिम (Mahim) भागातील नागरिकांना, लोकप्रतिनिधी यांना कोरोनाच्या प्रादुर्भावातुन मोठा दिलासा मिळाला आहे.

दादर, धारावी व माहिम या तीन भागात कोरोनाचा (corona) प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर नागरिक काहीसे टेन्शनमध्ये होते. धारावी विभाग विशेषतः धारावी झोपडपट्टी तर कोरोनाची ‘हॉटस्पॉट’ झाली होती. मे २०२० ला पालिका आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पालिका आयुक्त इकबाल चहल (BMC commissioner I S Chahal) यांनी दुसऱ्याच दिवशी धारावी सारख्या डेंजर हॉटस्पॉटच्या ठिकाणी स्वतः भेट देऊन पाहणी केली होती.

त्यांनी तातडीने शौचालयात नियमित सॅनिटायझर फवारणी करण्याचे व इतर काही उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. तर साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर (Kiran Dighavkar) यांनीही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या. परिणामी दादर, धारावी व माहिम या तिन्ही भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत गेला.

Also Read: ६०० कोटींचा कोरोना निधी असूनही जनता मदतीपासून वंचितच!

दिनांक २३ ऑक्टोबर २०२१ रोजी दादर, धारावी व माहिम या तिन्ही विभागात मिळून कोरोनाबाधित रुग्ण (corona patients) संख्या १० हजार ६५४, सक्रिय रुग्ण संख्या २३५ तर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या २६ हजार ९०४ एवढी नोंदविण्यात आली होती.

मात्र, आता एका महिन्याच्या कालावधीत पालिका आरोग्य यंत्रणा आणि साहाय्यक आयुक्त दिघावकर यांनी अथक प्रयत्न केल्याने आज २३ नोव्हेंबर २०२१ रोजी या तिन्ही विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २८ हजार ३७१, कोरोनाबाधित सक्रिय रुग्णांची संख्या ९३ तर कोरोनामुक्त रुग्ण संख्या २७ हजार २९७ एवढी नोंदविण्यात आली आहे.

म्हणजेच गेल्या एका महिन्याच्या कालावधीत कोरोना सक्रिय रुग्णांच्या संख्येत तब्बल १४२ ने म्हणजे ६०% ने घट झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, कोरोनाच्या संसर्गातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या ३९३ एवढी आहे.

सक्रिय रुग्णांच्या संख्येत दररोज सरासरी ४ -५ ने घट होत आहे. तर कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही दररोज सरासरी १३ – १४ ने वाढ होत आहे. मुंबईकरांसाठी ही बाब दिलासा देणारी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here