@maharashtracity

डायमेंशिया म्हणजेच अल्झायमर रुग्णांसाठी उपचार केंद्र

मुंबई: पालिकेच्या केईएम रुग्णालयात मुंबईतील पहिले मेमरी क्लिनिक (First memory clinic started in KEM Hospital) सुरु करण्यात आले आहे. आर्युमानात वाढ झाल्याने अल्झायमर (Alzheimer) आणि स्मृतीभ्रंशाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने मेमरी क्लिनिक सुरु करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले.

पालिकेचे अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्‍या हस्‍ते या सेवेचे लोकार्पण करण्‍यात आले. सध्‍या बाह्य रुग्‍णसेवा (ओपीडी) तत्‍त्‍वावर ही उपचार पद्धती उपलब्‍ध करुन देण्‍यात आली आहे. भविष्‍यात त्‍याचे काळजी केंद्रात (Day Care Centre) रुपांतर करण्‍याचे नियोजन असल्‍याची माहिती या लोकार्पण प्रसंगी काकाणी यांनी दिली.

दरम्यान, केईएम रुग्णालयात दर आठवड्याला 15 रुग्ण या समस्यांनी ग्रस्त असलेले दाखल होतात. सामाजिक भीतीपोटी बरेच रुग्ण उपचारासाठी पुढे येत नाहीत. यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. या क्लिनिकद्वारे रुग्णांच्या स्मरणशक्तीची विविध चाचण्यांच्या माध्यमातून तपासणी करण्यात येईल.

स्मरणशक्ती विषयी येणाऱ्या अडचणींचे अवलोकन करून त्यांचे वर्गीकरण केले जाईल. त्यानंतर रुग्णावर औषधोपचार करण्यात येईल. शिवाय, स्वत: च्या जीवनात ही व्यक्ती स्वतंत्र झाली पाहिजे यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगण्यात आले.

डिमेंशियाचे आठवड्याला किमान 10 ते 15 रुग्ण ओपीडिसाठी येतात. यात ही बरेचसे प्रकार आहेत. एका वर्षात किमान 150 ते 200 रुग्ण दाखल होतात. मेमरी क्लिनिकमध्ये रुग्णांचे पुनर्वसन, त्यांचे उपचार, मानसिक आधार आणि योग्य निदान केले जाणार असल्याचे केईएम रुग्णालयाच्या न्यूरोलॉजिस्ट विभाग प्रमुख डाॅ. संगीता रावत यांनी सांगितले.

केईएम रुग्णालय अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले की, अल्झायमर किंवा डिमेंशिया या आजाराच्या निदान आणि उपचारांसाठी हे क्लिनिक असेल. केईएम रुग्णालयात डे केअर सेंटर ही सुरू करण्यात येणार आहे.

मेमरी क्लिनिक हे एक मल्टिडिस्पलनरी टीम असलेले केंद्र असून डायमेंशिया म्हणजेच अल्झायमर आणि स्मृतीभ्रंशाच्या रुग्णांचे निदान आणि उपचार केले जाणार आहेत. यातून वैद्यकीय सुविधा, रुग्णांना मानसिक आणि सामाजिक आधार , त्यांचे पुनर्वसन केले जाते.

वारंवार विसरण्याचा त्रास होणे, गोष्टी लक्षात न राहणे, शब्द जोडण्यात अडचणी येणे, अशा सर्वाचा कार्यक्षमतेवर परिणाम होत असतात. यावर उपचारांची गरज भासत असल्याचे सांगण्यात आले.

डिमेंशिया इंडियाच्या अहवालानुसार राज्यात स्मृतिभ्रंशाचे प्रमाण 2006 मध्ये 2,77,000 वरून 2021 मध्ये 50,10, 00 पर्यंत वाढले आहे. भारतातील तरुण लोकसंख्येचा मोठा भाग असल्याने, पुढील दोन वर्षांमध्ये लोकांचे वय वाढल्याने डिमेंशियामुळे अजून भार वाढेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here