@maharashtracity

२०२१ मध्ये ८६५ रुग्णांची नोंद

मुंबई: कोरोना, ओमिक्रॉन विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबई महापालिका (BMC) झटत असताना साथीचे आजार (epidemic disease) झपाट्याने वाढत आहेत. गेल्या १९ दिवसांत मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो, कावीळच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार समोर आले.

यात मलेरिया (Malaria), डेंग्यू (Dengue) व गॅस्ट्रोच्या (Gastro) रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. तर डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सात पटीने वाढ झाली असून २०२१ मध्ये ८६५ रुग्णांची नोंद झाली आहे. तर, हीच संख्या मुंबईत गेल्या वर्षी एकूण १२९ एवढीच होती.

१ ते १९ डिसेंबरपर्यंत मलेरिया १७८, गॅस्ट्रो २५१, डेंग्यू २९, कावीळ २४, चिकनगुनिया (Chikungunya) ८, लेप्टो २ रुग्ण आढळल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. तर एच१एन१ संसर्ग नियंत्रणात असून गेल्या १९ दिवसांत एकही स्वाईन फ्लूचे (Swine flu) रुग्ण आढळलेले नाही.

यावर्षीप्रमाणे गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात एकाही रुग्णाची नोंद झाली नव्हती. दरम्यान गेल्या वर्षीच्या तुलनेत मुंबईत मलेरियाचा प्रादुर्भाव जास्त वाढला आहे. मुंबईत यावर्षी ५,०८३ मलेरियाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर, हीच संख्या २०२० मध्ये ५००७ एवढी होती.

१ जानेवारी ते १९ डिसेंबरपर्यंत आकडेवारी

मलेरिया ५,०८३
गॅस्ट्रो २,९२८
डेंग्यू ८६५
कावीळ २९५
लेप्टो २२२
चिकनगुनिया ७६
एच१एन१ ६४

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here