@maharashtracity

अतिवृष्टीत स्वच्छतेचे काम करणाऱ्या 300 कर्मचा-यांचा ना. आठवले यांच्या हस्ते सन्मान

मुंबई: पूरग्रस्त व दरडग्रस्त महाड, चिपळूण, सांगली, कोल्हापूर या शहरांना व अनेक गावांमध्ये गंभीर परिस्थिती होती. अशा गंभीर परिस्थितीत जीवाची पर्वा न करता तिथे आठ दहा दिवस स्वच्छतेचे चांगले काम करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांना मुंबई महानगरपालिकेने एक नव्हे तर दोन महिन्याचे अतिरिक्त वेतन द्यावे, अशी सूचना रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केली.

नामदार आठवले यांच्या हस्ते आझाद मैदान येथील मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात सफाई कामगारांचा स्वच्छता सैनिक योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

या सफाई कामगारांना व डॉ बाबासाहेब आंबेडकर श्रमसफल्य योजनेत कायम स्वरूपी घर देण्यात यावे, अशीही सूचना ना रामदास आठवले यांनी केली.

गेल्या २२ जुलै रोजी कोकणात अतिवृष्टी (heavy rain in Konkan) महापुरात महाड (Mahad), चिपळूण (Chiplun), सांगली (Sangli), कोल्हापूर (Kolhapur) या शहराचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. या शहराचे जनजीवन पुर्वपदावर आणणा-या मुंबई महानगर पालिकेच्या (BMC) सफाई कर्मचा-यांचे योगदान फार मोलाचे आहे.

कोरोनाच्या काळात मानवावर आलेले हे खुपच मोठे संकट आहे, एकप्रकारे युद्धच म्हणावे लागेल. या संकटकाळात या युद्धात सैनिक म्हणून आपलं कर्तव्य पार पडणाऱ्या ३०० सफाई कामगारांचा तसेच महाडमध्ये कामगारांनी ज्यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छतेचे काम केले ते पालिकेचे विशेष कार्य अधिकारी सुभाष दळवी यांचा म्युनिसिपल मजदूर संघाच्या वतीने स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन ना. रामदास आठवले यांच्या हस्ते यावेळी स्वच्छता सैनिक योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ना रामदास आठवले होते. म्युनिसिपल मजदूर युनियनचे ते अध्यक्षही आहेत. यावेळी पालिकेचे कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पालिकेचे सहाय्यक अभियंता पाटील, माजी उपप्रमुख अभियंता दिलीप थोरावडे, तसेच पगारे, प्रविण मोरे, तसेच असंख्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश जाधव यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here