@maharashtracity
मुंबई: मुंबई महापालिकेतील कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांना सेवा सातत्य सुरू ठेवण्यासाठी होत असलेली वैद्यकीय चाचणीची सक्ती (compulsion of medical test) रद्द करा, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने पालिका प्रशासनाकडे केली आहे.
पालिकेच्या कर्मचाऱ्यांना (BMC employees) 55 वर्षानंतर नोकरी पुढे सुरू ठेवायची असेल तर तीन महिने आधी पालिकेला मेडिकल रिपोर्ट सादर करावा अशी सक्ती करणारे परिपत्रक मार्चमध्ये काढले आहे.
या परिपत्रकाला कामगार आणि इतर कर्मचाऱ्यांनी विरोध करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईत सध्या कोरोना (corona) नियंत्रणात असून गेले अनेक महिने पालिका कर्मचारी, सुरक्षारक्षक, आरोग्य कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. त्यामुळे, अशा परिस्थितीत पालिका कर्मचाऱ्यांना मेडीकल रिपोर्टची सक्ती करणे चूकीचे आहे असे म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे म्हणणे आहे.
55 वर्षांनंतर 58 वर्षापर्यंत 3 वर्षांचा कालावधी खातेप्रमुखांच्या अधिकारात कर्मचाऱ्यांचा आरोग्य विषयक मागील अहवाल विचारात घेऊन सेवासातत्य मंजूर केली जाते. मात्र, ही पद्धत बंद करुन प्रशासनाने मार्च महिन्यात वैद्यकीय तपासणीचा फतवा काढला.
विरोधानंतर 6 महिन्यांसाठी तो स्थगित केला गेला. मात्र आता कोरोनासह ओमिक्रॉनचा (Omicron) धोका वाढत असताना पुन्हा एकदा नव्याने फतवा काढून कामगार (labour), कर्मचारी, अधिकारी यांना वेठीस धरले जात आहे. विशेष म्हणजे आरोग्य तपासणी करणाऱ्या डाॅक्टरांना कोणत्याही विशेष सुचना देण्यात आलेल्या नाहीत,
शिवाय, या कर्मचाऱ्यांना सामान्य नागरिकांच्या रांगेत उभे राहून इतर तपासण्या करुन घ्याव्या लागतील. यातुन कोविड संसर्ग पसरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यासह नियुक्तीच्या वेळी वैद्यकीय चाचणीची सक्ती असते ती योग्य आहे. पण, निवृत्तीकडे गेलेल्या कर्मचाऱ्यांना सेवा सुरू ठेवण्यासाठी चाचण्यांची अट हे अन्यायकारक आहे.
त्यामुळे आधीपासून सूरू असलेली 58 वर्षापर्यंतची सेवाकाळ पद्धत कायम ठेवा आणि हे सक्तीचे परिपत्रक रद्द करा अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम (Baba Kadam) यांनी आयुक्तांकडे (BMC Commissioner) केली आहे.