@maharashtracity

२८ सप्टेंबरला फक्त विद्यार्थी, शिक्षकांसाठी सकाळच्या सत्रात लसीकरण

२८ सप्टेंबरला दुपारनंतर लसीचा दुसरा डोस

मुंबई: मुंबई महापालिकेने (BMC) दिनांक १७ सप्टेंबर रोजी फक्त महिलांसाठी पहिली विशेष लसीकरण मोहीम राबवली होती. त्यावेळी १ लाख २७ हजार ३५१ महिलांना लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला. आता पुन्हा एकदा २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या कालावधित फक्त महिलांसाठी लसीकरणाचे (पहिला व दुसरा डोस) आयोजन सर्व शासकीय, पालिका लसीकरण केंद्रांवर करण्यात आले आहे. (Vaccination only for women)

पालिकेने कोरोनावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण मोहीम सुरू केली आहे. समाजातील विविध घटकांना लसीचे डोस दिले जात आहेत.

त्याचप्रमाणे, ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू होणार असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने २८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या पहिल्या सत्रात शिक्षक, १८ वर्ष व त्यावरील वयाचे विद्यार्थी यांना लस देण्यात येणार असून याच दिवशी दुपारी ३ ते रात्री ८ यावेळेत लसीचा फक्त दुसरा डोस देण्यात येणार आहे. (Vaccination to teachers and students)

मात्र यावेळी कोणालाही पहिला डोस देण्यात येणार नाही. या दोन्ही दिवशी, मुंबईतील सर्व शासकीय व महापालिका लसीकरण केद्रांवर थेट येवून (वॉक इन) संबंधित घटकातील पात्र नागरिकांना लस घेता येईल. त्यासाठी ऑनलाईन पूर्व नोंदणीची आवश्यकता नाही.

पात्र लाभार्थ्यांनी येताना, शासकीय ओळखपत्र आणणे आवश्यक असेल. तसेच शिक्षक व विद्यार्थी यांनी शैक्षणिक संस्थांचे ओळखपत्र देखील सोबत आणणे आवश्यक आहे.

यासंदर्भातील माहिती पालिका जनसंपर्क विभागामार्फत देण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेने १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू केली असून आतापर्यंत, हेल्थ वर्कर, फ्रंट लाईन वर्कर, ६० वर्षीय नागरीक, ४५ – ५८ वयोगट, १८ – ४४ वयोगट, स्तनदा माता, गर्भवती महिला, विदेशात शिक्षण घेणारे विद्यार्थी, अंथरुणावर खिळून असलेले आजारी, दिव्यांग व्यक्ती आदींना लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात आलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here