@maharashtracity

मुंबई: मुंबई महापालिका (BMC) आरोग्य यंत्रणेला गेल्या दीड वर्षांपासून भेडसावणाऱ्या कोरोनावर नियंत्रण (corona under control) मिळविण्यात यश आले आहे. मात्र दुसरीकडे, मुंबईत साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. १ ते ७ नोव्हेंबर या आठवड्याभरात मलेरियाचे (malaria) – ७२, डेंग्यूचे (Dengue) – ४७, गॅस्ट्रोचे (gastro)- ४९ चिकनगुनियाचे (chikangunya) – ६ व स्वाईन फ्ल्यू (swine flu)- १ रुग्ण आढळून आले आहेत.

त्यामुळे मुंबई महापलिका आरोग्य यंत्रणेला सजग व सुसज्ज राहावे लागत आहे.

गेल्या मार्च २०२० पासून मुंबईत कोरोनाने तळ ठोकला आहे. कोरोनाची पहिली व दुसरी लाट परतावून लावण्यात आणि कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यात पालिका आरोग्य यंत्रणेला चांगलेच यश आले आहे. मात्र नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शहर व उपनगरात
मलेरिया, गॅस्ट्रो, डेंग्यु आणि स्वाइन फ्ल्यू, लेप्टोचे रुग्ण आढळले आहेत.

सुदैवाने या आजारांनी कोणाचाही मृत्यू झालेला नाही. मात्र एकीकडे कोरोनाचा धोका कमी झाल्याचे समाधान असताना साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे. पालिका यंत्रणेकडून साथीच्या आजारांना रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र नागरिकांनीही आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे.

१ ते ७ नोव्हेंबर आढळलेले रुग्ण

मलेरिया – ७२
डेंग्यू – ४७
गॅस्ट्रो – ४९
चिकनगुनिया – ६
कावीळ – ६
स्वाईन फ्ल्यू – १
लेप्टो – १

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here