@maharashtracity

मुंबई: मुंबईत गेल्या २४ तासांत कोविडबाधित ८ हजार ६३ रुग्ण आढळून आल्याने कोविडचा धोका आणखीन वाढत असल्याचे समोर आले आहे. तर दुसरीकडे दिवसभरात कोविड बाधित रुग्णांच्या (covid patients) मृत्यू प्रमाण आठव्यांदा ‘शून्य’ नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या दृष्टीने ‘कही खुशी, कही गम’, असे म्हणावे लागेल.

मुंबईत (Mumbai) काही बेफिकीर नागरिकांच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे गेल्या काही दिवसांपासून कोविड व ओमायक्रॉन (Omicron) बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे मुंबईकरांचे व पालिका आरोग्य यंत्रणेचे टेन्शन वाढले आहे.

त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे गेल्या डिसेंबर महिन्यात कोविड बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण हे ७ वेळा ‘शून्य’ इतके नोंदविण्यात आले आहे.११,१५,१८,२०,२२,२५ आणि ३० डिसेंबरला कोविड बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण ‘शून्य’ एवढे नोंदविण्यात आले आहे. आता २ जानेवारी २०२२ रोजीसुद्धा कोविड बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण हे ‘ शून्य’ इतके (zero covid patient) नोंदविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here