@maharashtracity

मुंबई: शैक्षणिक शुल्क माफीसह विविध मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देऊनही अनेक महिने उलटले तरी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने अद्याप कार्यवाही न केल्यामुळे संतप्त झालेल्या निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने अखेर आजपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. (Resident doctors on strike)

या संपाला सकाळी ८ वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. यामुळे काही सरकारी रुग्णालयातील ओपीडीवर किंचित परिणाम झाला असल्याचे दिसून आले (OPD influenced due to strike of resident doctors). दरम्यान अर्थ आणि आरोग्य सचिव यांच्या सोबत मार्ड प्रतिनिधींची बैठक झाली. मात्र चर्चेतून काही निष्पन्न झाले नसल्याचे मार्ड प्रतिनिधींनी सांगितले.

चर्चाच फिस्कटल्याने काम बंद आंदोलनावर डॉक्टर ठाम असल्याचे मार्डकडून सांगण्यात आले. म्हणून शनिवारीदेखील सरकारी रुग्णालयातील रूग्ण सेवेवर काय परिणाम होतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

शुक्रवारी पालिका तसेच राज्य सरकारी रुग्णालयात ओपीडी विभागातील काम सिनियर डॉक्टरांनी सांभाळले असल्याचे सांगण्यात आले. रोजच्या ओपीडी रूग्णसंख्ये इतकी रूग्ण संख्या तपासून झाली नसली तरी देखील बऱ्यापैकी रूग्ण तपासून झाले असल्याचे चित्र केईएम आणि जेजे रुग्णालयात होते.

शुक्रवारी सचिवांशी बोलणी फिस्कटल्याने डॉक्टरांनी आंदोलन सुरु ठेवणार असल्याचे सांगितले. (Negotiation talk with health secretary was not fruitful) या संपात राज्यातील ५ हजारांहून अधिक डाॅक्टर्स सहभागी झाले आहेत.

शनिवारी देखील आंदोलन सुरु राहिल्यास रुग्ण सेवेवर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, रुग्णसेवेवर परिणाम होणार नाही, असे आश्वासन डाॅक्टरांकडून देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here