@maharashtracity

मुख्यमंत्र्यांच्या अभिनेत्री वर्षा दांदळे यांना शुभेच्छा

मुंबई: मुंबई महापालिका शाळांमधील शिक्षिका व अभिनेत्री वर्षा दांदळे (actress Varsha Dandale) यांच्या अपघाताची बातमी समजताच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः चौकशी केली. (CM Uddhav Thackeray enquire about the health of Varsha Dandale)

तसेच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांना, नाशिक (Nasik) येथे वर्षा दांदळे यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यास सांगितले होते. त्यानुसार महापौरांनी मंगळवारी स्वतः भेट देऊन वर्षा यांची विचारपूस केली.

याप्रसंगी, नगरसेविका सिंधू मसुरकर उपस्थित होत्या.

पालिका शिक्षिका व अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी वैद्यकीय सल्ल्याने औषधोपचार घेऊन लवकरात लवकर बरे व्हावे आणि पुन्हा एकदा चित्रपट क्षेत्रात नव्या उत्साहाने, उमेदीने काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन करावे, या शब्दात महापौर किशोरी पेडणेकर यांनी, वर्षा यांना शुभेच्छा दिल्या.

तसेच, अभिनेत्री वर्षा दांदळे या लवकरात लवकर बरे होण्यासाठी महापौरांनी ईश्वरचरणी प्रार्थना केली. त्याचप्रमाणे, महापौरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अभिनेत्री वर्षा दांदळे यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती देऊन आपले कर्तव्य बजावले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here