Twitter : @maharashtracity

ठाणे 

आर्य क्रिडा मंडळ व ठाणे जिल्हा ब्रीज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील नामवंत ब्रीज खेळाडू दिवंगत सुधाकर पर्वते यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय ब्रीज स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले. आर्य क्रिडा मंडळ, गावदेवी, ठाणे (प) येथे ही स्पर्धा पार पडली. ही स्पर्धा पेअर्स पद्धतीने दोन सत्रांमध्ये खेळविण्यात आली.

या स्पर्धेत राज्यभरातून ३८ संघांनी सहभाग घेतला. विवेक भांड आणि प्रकाश परांजपे या जोडीने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अनिरूध्द संझगिरी, अंबीकर यांनी यावेळी दिवंगत पर्वते यांच्या आठवणींना उजाळा दिला. स्पर्धेचे डायरेक्टर भालचंद्र दक्षिणदास, पर्वते यांची कन्या शैला, मुलगा सतीश, आर्य क्रीडा मंडळाचे पाटणकर यांच्यासह अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी सतीश यांनी ठाणे जिल्हा ब्रीज असोसिएशनला दिवंगत पर्वते यांच्या स्मरणार्थ पंधरा हजार रूपयांचा धनादेश दिला. तसेच दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here