रिपाईची भाजपकडे दहा जागांची मागणी

मुंबई: भारतीय जनता पक्षाचा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टीने विधानसभा निवडणुकीसाठी दहा जागांची मागणी केली आहे. रिपाईने मुंबईतील भाजपच्या ताब्यातील वर्सोवा या जागेवर दावा केला असून बदललेल्या राजकीय परिस्थितीत शिवसंग्राम पक्षाचे विनायक मेटे यांच्या समर्थक आणि भाजपच्या विद्यमान आमदार भारती लव्हेकर यांना डावलून भाजप ही जागा रिपाईला देण्याची शक्यता आहे.

इस्कॉन चे अध्यक्ष लखमेन्द्र खुराणा हे रिपाईचे उमेदवार असतील असा दावा पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने केला. खुराणा यांनी बहुजन समाज पक्षाचे उमेदवार म्हणून मुबंई उत्तर मतदारसंघातून 2009 ची लोकसभा निवडणूक लढवली होती. फाळणीनंतर पाकिस्तानातून उत्तर प्रदेशात स्थलांतरित झालेले खुराणा कुटुंबीय नंतर मुंबईत आले आणि स्थिरावले.

हेमंत सावंत, रिपाईचे वरिष्ठ नेते यांनी सांगितले की रिपब्लिकन पक्ष प्रमुख आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे नेतृव मान्य केलेले खुराणा यांनी गेल्या काही महिन्यात पूरग्रस्त कोल्हापूर-संगलीसाठी 11 लाख रुपयांची मदत केली. याव्यतिरिक्त सुमरे पन्नास लाखाची मदत वेगवेगळ्या कार्यासाठी केली आहे.

रिपाईने भाजपकडे वर्सोवा यासह एकूण 10 जागेची मागणी केली आहे. आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले या गेल्या काही महिन्यात सांगली मतदारसंघात सक्रिय झाल्या आहेत. आठवले यांचा पत्नीला राजकारणात उतरविण्यास विरोध नसला तरी आताच विधानसभा निवडणूक लढवू नये असे मत व्यक्त केल्याचे पक्षाचे नेते सांगतात. त्याचवेळी कार्यकर्ते सीमा आठवले यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत.

भाजपने अद्याप घटक पक्षाना किती जागा सोडायच्या याचा अंतिम निर्णय घेतलेल नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनदेश यात्रेचा समारोप गुरुवार दि १९ रोजी नाशिक येथे।समारोप आहे. त्यानंतर दि 23 रोजी मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात युतीच्या जागा वाटप संदर्भात बैठक होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, युतीचे सहकारी असलेले विनायक मेटे यांनी बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे यांच्या विरोधात घेतलेली भूमिका भाजपच्या पचनी पडलेली नाही आणि म्हणून कदाचित मेटे समर्थक असलेल्या वर्सोवाच्या आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता भाजप सूत्रांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here