महाराष्ट्र (Maharashtra) भारतीय जनता पक्षाचे (Bharatiya Janata Party – BJP) दादा नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी कोल्हापूर (Kolhapur) जिल्हा भाजपमुक्त (BJP-Free) झाल्याचे खापर शिवसेनेचे (Shiv Sena) कोल्हापूरचे तरुण खासदार (Member of Parliament -MP) संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांच्यावर फोडले आहे. मंडलिक यांनी उघडपणे बंटी (सतेज) पाटील (Satej Patil) यांना मदत केली आणि त्यांचे पुतणे ऋतुराज पाटील (Ruturaj Patil) यांना निवडून आणले, असा आरोप चंद्रकांत पाटील याजी आज पुण्यात (Pune) केला.

दादा पाटील यांची कर्मभूमी कोल्हापूर. पाटील पुणे पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषदेवर (Legislative Council) दोन वेळा निवडून आले. नुकत्याच झालेल्या विधानसभा (Assembly) निवडणुकीत (Polls) दादा पाटील पुण्यातील कोथरूड (Kothrud) या ब्राम्हणबहुल (Brahmin Dominated) मतदारसंघातून (constituency) निवडून आले आहेत.

मराठा (Maratha) समाजाचे सक्षम नेतृत्व असलेले दादा पाटील यांनी कोल्हापूर, सांगली (Sangli), सातारा (Satara) या मराठाबहुल (Maratha dominated) जिल्ह्यातून निवडणूक लढवण्याऐवजी कोथरूड या सुरक्षित मतदारसंघासाची निवड केल्यामुळे त्यांच्यावर काही काळ टीकाही झाली होती. मात्र, त्यांची निवड योग्य होती, हे निवडणूक निकालाने दाखवून दिले आहे.

कोल्हापूरमध्ये भाजप-शिवसेना युतीचे (alliance) पानिपत झाले असून जिल्ह्यातून भाजपचे नामोनिशाण मिटले आहे. तर शिवसेनेला पाच पैकी एक जागा जिंकून स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करावी लागली आहे.

पुण्यात पक्षाच्या पराभवाचे विश्लेषण करतांना पाटील यांनी त्याचे खापर सेना खासदार मंडलिक यांच्यावर फोडले आहे. ‘आमचे ठरले आहे’, हे घोषवाक्य लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीत प्रसिद्ध झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party – NCP) तत्कालीन खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी 2014 च्या विधनसभा निवडणुकीत केलेल्या दगाबाजीला काँगेस जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर दिले. महाडिक यांचा पराभव करतांना सतेज पाटील यांनी उघडपणे सेनेचे मंडलिक यांच्यामागे काँग्रेसची ताकद उभी केली आणि त्यांना निवडून आणले. मंडलिक यांनी या उपकाराची परतफेड करतांना ऋतुराज पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना मदत केली.

दादा पाटील यांनी या घडामोडीचा उल्लेख करून खासदार मंडलिक यांच्यामुळेच भाजप ला पराभव पत्करावा लागला, असा आरोप केला. मंडलिक यांच्या पक्षाने याबाबत चिंतन करावे, असाही सल्ला त्यांनी शिवसेनेला दिला.

ते म्हणाले, ज्यांनी टोल (Toll) आणला, ज्यांनी कोल्हापूर बकाल केले, त्यांना लोकांनी निवडून दिले आणि आम्ही कोल्हापूर टोलमुक्त केले, कोल्हापूरचा विकास (development) केला, तरिही लोकांनी आम्हाला नाकारले, यामागचे कारण कळत नाही, असे दादा पाटील म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here