मध्य प्रदेशचे (Madhya Pradesh) माजी मुख्यमंत्री (Chief minister) आणि काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यांनी ‘त्या’ प्रकरणात केलेले आरोप कौशल्य विकास (Skill Development) मंत्री संभाजी निलंगेकर-पाटील (Sambhaji Nilangekar-Patil) यांनी स्पष्ट शब्दात फेटाळून लावले आहेत. आपल्यावरील आरोप सिद्ध झाल्यास आपण राजकारण संन्यास घेऊ असे निलंगेकर यांनी thenews21 शी बोलताना सांगितले.

पाटील म्हणाले, सहा-सात वर्षांपूर्वी घडलेल्या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही. मध्य प्रदेश भारतीय जनता युवा मोर्चाचे (BJYM) अध्यक्ष जितू जीराती यांनीही दिग्विजय सिंह यानु केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. श्वेता जैन या कधीही भज्युमोच्या सरचिटणीस नव्हत्या तर केवळ कार्यकारिणी सदस्य होत्या, याकडे निलंगेकर-पाटील यांनी लक्ष वेधले.

मंत्री निलंगेकर पुढे म्हणाले की त्यांनी कधीही जैन यांना त्यांच्या कौशल्य विकास विभागाचे काम दिलेले नाही. आपल्यावरील आरोप खोटे असून दोषी आढळल्यास राजकारण संन्यास घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.

निलंगेकर म्हणाले की ते सुदैवी आहेत की त्यांना पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या प्रधान्यक्रमावर असलेले कौशल्य विकास मंत्रालयाचा कारभार हाताळता आला. “मला आनंद आहे की माझ्या कारकिर्दीत रोजगार उपलब्ध होतील, यासाठी जागतिक दर्जाच्या असंख्य कंपनीसोबत करार करण्यात आले. यातून महाराष्ट्रात कुशल मनुष्यबळ (Skilled Manpower) निर्माण करणे शक्य झाले आणि त्याचा फायदा लाखो युवकांना झाला. यात रोजगार तर निर्माण झालेच, सरकारच्या निधीची मोठ्या प्रमाणात बचत झाली,” असे संभाजी निलंगेकर-पाटील यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here