@maharashtracity

यापूर्वी १ हजार ७२० कोटींचे रस्ते कामांचे ३९ प्रस्ताव मंजूर

१० दिवसांत रस्ते कामांचे तब्बल २ हजार १३३ कोटींचे प्रस्ताव

मुंबई: मुंबईत (Numbai) निवडणुकीच्या तोंडावर स्थायी समितीच्या २९ ऑगस्ट रोजी येऊ घातलेल्या बैठकीत शहर व पश्चिम उपनगरात ४१३ कोटी रुपयांच्या सिमेंट काँक्रीट रस्ते कामांचे ९ प्रस्ताव मंजुरीला येणार आहेत.

यापूर्वी, २० डिसेंबर रोजीच्या बैठकीत १ हजार ७२० कोटी रुपयांच्या सिमेंट काँक्रीट रस्ते (cement concrete roads) कामांचे ३९ प्रस्ताव भाजपच्या (BJP) विरोधाला न जुमानता सत्ताधारी शिवसेनेने (Shiv Sena) विरोधी पक्षाच्या सहकार्याने मंजूर केले होते.

वरील ४१३ कोटींचे प्रस्तावही मंजूर झाल्यास अवघ्या १० दिवसांत रस्ते कामांचे तब्बल २ हजार १३३ कोटींचे प्रस्ताव मार्गी लागतील. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर कंत्राटदारांची (contractors) चांदीच चांदी होणार आहे.

आता नव्याने सादर रस्ते कामांच्या ४१३ कोटींच्या ९ प्रस्तावात कंत्राटदारांनी १३.५१ टक्के ते २२.६८ टक्के कमी दरात काम करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे भाजप नगरसेवकांकडून पुन्हा एकदा रस्ते कामांच्या दर्जावर बोट ठेऊन या प्रस्तावांना विरोध होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

पश्चिम उपनगरातील ७ वार्डात २८७ कोटी रुपयांची तर शहर भागात ३ वार्डात १२६ कोटी रुपयांची लहान, मोठ्या रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here