@maharashtracity

मुंबई: राष्ट्रीय विषाणू विज्ञान (National Institute of Virology – (NIV) संस्थेकडून प्राप्त झालेल्या १९ डिसेंबर रोजीच्या जनुकीय नमुना (Genome Sequencing) निदान अहवालानुसार ४ ओमिक्रॉनबाधित (Omicron) आढळून आले. मात्र ही चारही जण मुंबई बाहेरील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले.

हे चौघेही लक्षणविरहीत असून त्यांना निरीक्षणाखाली रुग्णालयात ठेवण्यात आले असल्याचे मुंबई आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, या चार रुग्णांमध्ये २१ वर्षीय औरंगाबादची (Aurangabad) रहिवासी महिला युनायटेड किंग्डम (UK) येथून १४ डिसेंबर रोजी मुंबईला (Mumbai) आली होती. १४ डिसेंबर रोजी तिची कोविड चाचणी (Covid test) सकारात्मक आल्याने तिचे नमुने जनुकीय विश्लेषणासाठी पाठविण्यात आले.

या रुग्ण महिलेने कोविड फायझर (Pfizer vaccine) लसीच्या दोन्हीही मात्रा पूर्ण केल्या असून तिच्यात कोणतेही लक्षणे नाहीत. मात्र या रुग्णाला खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

Also Read: अवैधरित्या सही करणारे दोन पॅथॅालॉजिस्ट डॉक्टर निलंबित

४१ वर्षीय दमनचा (Daman) रहिवासी पुरुष युनायटेड किंग्डम येथून १४ डिसेंबर रोजी मुंबईला आला होता. त्याच दिवशी त्याची कोविड चाचणी सकारात्मक आल्याने त्याचे नमुने जनुकीय विश्लेषणासाठी पाठविण्यात आले. या रुग्णाने देखील कोविड एसट्राझेनेका लसीच्या (AstraZeneca vaccine) दोन्ही मात्रा पूर्ण केल्या आहेत. यांनाही कोणतीही लक्षणे नसून खबरदारी म्हणून रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.

५७ वर्षीय कर्नाटकातील (Karnataka) रहिवासी पुरुष टांझानिया (Tanzania) येथून तसेच ३८ वर्षीय कर्नाटकची रहिवाशी महिला टांझानिया येथून मुंबईला आली होती. या दोघांची त्याच दिवशी त्याची कोविड चाचणी सकारात्मक आल्याने नमुना जनुकीय विश्लेषणासाठी पाठविण्यात आले होते. या रुग्णाच्या कोविशिल्ड लसीच्या (Covishield) दोन्ही मात्रा झाल्या आहेत.

यांनाही लक्षणे नसून त्यांना रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. या चौघातील एकही रुग्ण गंभीर नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान ओमिक्रॉन बाधित रुग्णांपैकी १३ रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात अला असल्याचे सांगण्यात आले.

दिनांक १८ डिसेंबरपर्यंत ९ हजार ४७७ जण परदेशातून आले असल्याचे सांगण्यात आले. यातील २३ रुग्ण ओमिक्रॉनचे असून यात १७ पुरुष आणि ६ महिला असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here