@maharashtracity

89 टक्के लक्षणरहित रूग्ण

मुंबई: मुंबईत रविवारी 8063 नवीन कोविड रूग्ण (covid patients) आढळून आले असून त्यापैकी 89% पूर्णपणे लक्षणे नसलेले (asymptomatic) आढळले आहेत. तर मुंबईत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या आता 29819 आहे.

मात्र 8063 नवीन प्रकरणांपैकी फक्त 503 रूग्णालयात दाखल झाले आहेत. 56 रुग्णांना ऑक्सिजनयुक्त बेडवर (oxygen bed) ठेवण्यात आले आहे. आजमितीस मुंबईतील (Mumbai) रुग्णालयातील ९०% खाटा रिक्त असल्याचे मुंबई महानगर पालिका (BMC) प्रशासनाने सांगितले.

दरम्यान, मुलुंड कोविड सेंटरमध्ये (Mulund Covid Center) रुग्णांची गर्दी वाढू लागली असल्याचे समजत आहे. तर इतर कोविड सेंटर मध्ये चौकशीचे फोन खणखणू लागले आहेत. यावर पालिका आयुक्त इकबाल चहल (BMC Commissioner IS Chahal) यांनी सांगितले की, होम क्वारंटाईन (Home Quarantine) केलेल्या सर्व रूग्णांना होम क्वारंटाईन मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे. जेणेकरून मुंबईतील विषाणूचा प्रसार शक्य तितक्या लवकर रोखता येईल.

कोविडचे काटेकोरपणे पालन करावे. घाबरण्याचे कारण नाही. परंतु त्याच वेळी आपण सर्वांनी अत्यंत सावध राहून कोविड योग्य वर्तन केले पाहिजे. सार्वजनिक क्षेत्रात मास्क (Mask) अनिवार्य असून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. कोविड महामारीच्या (covid pandemic) या नव्या लाटेवर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज असल्याचे चहल म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here