मुंबईत दिवसभरात ५०३ बाधित 

@maharashtracity

मुंबई: राज्यात शनिवारी ८,२९६ नवीन रुग्णांची नोंद (corona update) झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६१,४९,२६४ झाली आहे. काल ६,०२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ५९,०६,४६६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०५ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १,१४,००० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात (Maharashtra) शनिवारी १७९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. नोंद झालेल्या एकूण १७९ मृत्यूंपैकी १४३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने  राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ३१५ ने वाढली आहे. 

हे ३१५ मृत्यू, पुणे-१४२, सांगली-७४, कोल्हापूर-१३, नाशिक-१३, ठाणे-१२, औरंगाबाद-१०, रत्नागिरी-१०, सोलापूर-६, अमरावती-५, पालघर-५, हिंगोली-४, उस्मानाबाद-४, चंद्रपूर-३, लातूर-३, सातारा-३, अहमदनगर-२, बुलढाणा-२, बीड-१, नांदेड-१, परभणी-१ आणि सिंधुदुर्ग-१ असे आहेत. 

सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या  ४,३८,००,१३९ प्रयोगशाळा  नमुन्यांपैकी ६१,४९,२६४ (१४.०४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.सध्या राज्यात ५,८५,५८० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये (home quarantine)आहेत तर ४,७३७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

मुंबईत दिवसभरात ५०३

मुंबईत (Mumbai) दिवसभरात ५०३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७२७१३६ एवढी झाली आहे. तर १३ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १५६१२ मृत्यूची नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here